अरूणा प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही - भाजप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

वैभववाडी - भाजप पदाधिकाऱ्यांनी अरूणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठण व बुडीत क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनापुढे हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी अतुल रावराणे आणि संदेश पारकर यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचविण्याचे काम केले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

वैभववाडी - भाजप पदाधिकाऱ्यांनी अरूणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठण व बुडीत क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनापुढे हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी अतुल रावराणे आणि संदेश पारकर यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचविण्याचे काम केले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

अरूणा प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी खासदार विनायक राऊतांची भेट घेतली होती. यावेळी खासदार राऊत यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना पाहणी करण्याची सुचना केली होती. त्यानुसार आज भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, सभापती लक्ष्मण रावराणे, सज्जन रावराणे, किशोर दळवी, संतोष माईणकर, रणजित तावडे आदी पदाधिकारी पुनर्वसन गावठणाची पाहणी करण्यासाठी पोहोचले.

यावेळी तानाजी कांबळे, विलास कदम, अजय नागप यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेडची पाहणी करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांनी गावठाणातील सर्व समस्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यावेळी प्रकल्पग्रस्त आणि कार्यकारी अभियंता यांच्यात शाब्दीक खटके उडाले. प्रकल्पग्रस्तांनी गावठणात वीज पुरवठा नाही, शौचालय सुविधा नाही, पाण्याची सुविधा नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे निदर्शनास आणुन दिले. निवारा शेडची दुरावस्था देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दाखविली.

त्यानतंर बुडीत क्षेत्राची पाहणी करण्यासाठी पदाधिकारी आखवणे, भोममध्ये दाखल झाले. तेथील प्रकल्पग्रस्तांनी तर प्रशासनाने आपल्यावर कसा अन्याय केला याचा पाढाच वाचला. निवारा, पाणी, वीज या मुलभुत सुविधा नसताना जायचे कुठे असा प्रश्‍न त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. याशिवाय आता देखील प्रशासनाने गावातील विज पुरवठा खंडीत करणे, रस्ता खोदणे असे प्रकार करून प्रकल्पग्रस्तांची कोंडी सुरू केल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन दिले.

यावेळी अतुल रावराणे आणि संदेश पारकर यांनी आपल्या सर्व समस्या येत्या दोन दिवसांत लेखी स्वरूपात द्या. त्या मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्यापर्यत पोहोचविण्यात येतील असे आश्‍वासन दिले. बुडीत चर्चा करताना प्रांतधिकारी चंद्रकांत मोहीते देखील उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP activists visit Aruna Project