सावंतवाडी घंटानाद आंदोलन : दार उघड 'उद्धवा' दार उघड…! दार उघड विठ्ठला दार उघड…!,

रूपेश हिराप 
Saturday, 29 August 2020

बंद असलेली मंदिरे,चर्च,मशिदी सुरू कराव्यात यावी,या मागणीसाठी  घंटानाद आंदोलन

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :महाराष्ट्र राज्यातच मंदिरे देवस्थाने आणि चर्च  मशिदी  बंद ठेवण्यात आलेले  आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिरे,चर्च,मशिदी सुरू कराव्यात यावी,या मागणीसाठी आज जिल्हा भाजपाच्या वतीने सावंतवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई  मंदिरासमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.यावेळी दार उघड उद्धवा दार उघड…! दार उघड विठ्ठला दार उघड…!,असा गजर करण्यात आला. सुरुवातीला गणपतीची नंतर शंकराची आणि त्यानंतर देवीची आरती करण्यात आली.

यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले इतर राज्यात मोठ मोठी देवालये उघडण्यात आली असतांना महाराष्ट्र सरकारकडून देवालये उघडण्यात आली नाही.त्यामुळे हिंदू देवस्थानांची मंदिरे तात्काळ उघडा जिल्ह्यातील 261 ठिकाणी मंदिरे व देवालय उघडावी त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोरोना च्या पार्श्वभूमीवर अधिक गर्दी होऊ नये यासाठी ठराविक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हे आंदोलन जिल्ह्यात एकाच वेळी करण्यात आले.

हेही वाचा- चाकरमान्यांची लगबग, सावंतवाडी आगार सज्ज, आरक्षण फुल्ल

एकीकडे राज्य शासन दारू विक्रीची दुकाने सुरू करतात दारू ची सोय केली जाते मग जनमानसातील श्रद्धास्थाने असलेली देवाले बंद का सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा हा विषय आहे.ई पास च्या बाबतीतही इतर राज्यात नियम रद्द करण्यात आला.पण महाराष्ट्र सरकार अद्यापही ई पास बाबत गंभीर आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली,भाजपा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर आनंद नेवगी मनोज नाईक,नगरसेविका दीपाली भालेकर , शहर उपाध्यक्ष अजय गोंदावळे,दिलीप भालेकर,
बंटी राजपुरोहित, पुखराज पुरोहित संदेश टेंबकर,सुमित वाडकर,निशांत तोरसकर,गुरु मठकर,केतन आजगावकर,किशोर चिटणीस निशिकांत तोरसकर विनायक गुरव आदी उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Bell ringing agitation in front of Shri Vitthal Rakhumai temple at Sawantwadi