esakal | राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेनंतर भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena

राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेनंतर भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

sakal_logo
By
संतोष कुलकर्णी

देवगड : भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची कोकणातील जन आशिर्वाद यात्रा संपल्यानंतर शिवसेनेने भाजपमधीलच येथील नगरपंचायतीमधील दोन नगरसेवकांना आपल्या तंबूत घेतले. आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत नगरसेविका हर्षा ठाकूर आणि नगरसेवक विकास कोयंडे यांचा मुंबईत शिवसेना पक्षात प्रवेश झाला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह विविध नेतेमंडळी उपस्थित होती.

भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची नुकतीच जन आशिर्वाद यात्रा झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील सत्ताधारी भाजपाचे दोन नगरसेवक शिवसेना पक्षात सामील झाले आहेत. मुंबईत वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश झाल्याचे शिवसेनेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या नगरसेविका हर्षा ठाकूर आणि विकास कोयंडे यांचा शिवसेना पक्ष प्रवेश घेण्यात आला.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, तालुकाप्रमुख विलास साळसकर, उपतालुकाप्रमुख बुवा तारी, हर्षद गावडे, बुवा तारी यांच्यासह अन्य उपस्थित होते.

हेही वाचा: सिंधुदुर्गातील शिक्षकांनी उभारला तब्बल 44 लाखाचा ऑक्सीजन प्लांट

देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील नगरसेवक विकास कोयंडे आणि नगरसेविका हर्षा ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेना पक्षात प्रवेश केल्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सूचक ट्टिवट करून शिवसेनेला कोपरखळी मारली आहे.

“आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांना वेडं बनवायचं, यालाच म्हणतात “येड्याची जत्रा” असे ट्टिवट करून शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या विषयावरून आता राजकीय धुमशान रंगण्याची लक्षणे आहेत.

loading image
go to top