esakal | सिंधुदुर्गातील शिक्षकांनी उभारला तब्बल 44 लाखाचा ऑक्सीजन प्लांट
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher

सिंधुदुर्गातील शिक्षकांनी उभारला तब्बल 44 लाखाचा ऑक्सीजन प्लांट

sakal_logo
By
तुषार सावंत -सकाळ वृत्तसेवा

कणकवली : तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्गातील शिक्षकांनी तब्बल 44 लाखाचा अद्यावत असा ऑक्सिजन प्लांट आणि कोव्हिड सेंटर उभारले आहे. येत्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी या ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन होऊन शासनाला हा अध्यावत प्लांट लोकार्पण केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा: तब्बल 18 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ; एकाला अटक

कणकवली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हा अद्यावत असा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. याविषयी माहिती देताना श्री.कदम म्हणाले देशासह राज्यात प्रथमच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून 46 लाख रुपये निधी गोळा करण्यात आला. मात्र मध्यंतरी नैसर्गिक आपत्तीमुळे या प्लांटची उभारणी थोडीफार लांबली पण येत्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता असून जिल्ह्यातील गोरगरीब कोरोना ग्रस्त रुग्णांना याचा लाभ मिळावा या हेतूने प्राथमिक शिक्षक समितीच्या 2047 सदस्य तसेच हितचिंतकांच्या माध्यमातून आक्सिजन प्लांट उभा करण्यात आला आहे. येत्या पाच सप्टेंबरला सकाळी 9 वाजता प्लांट उद्घाटन करून जिल्हा प्रशासनाला हस्तांतरित केला जाणार आहे.

हेही वाचा: 'वसुंधरेला धनधान्याने समृद्ध करा'; राज्यपालांचे विद्यार्थ्यांना आवाहन

या प्लांटसाठी पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या सर्व लोकप्रतिनिधी सहकार्य केले आहे. वेगवेगळ्या ठिकाणांवरून साहित्य गोळा करून हा अद्यावत असा प्लांट उभारण्यात आला आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 35 ऑक्सिजन बेड युक्त वार्ड तयार करण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांट मधून 333 mp चे उत्पादन नियमितपणे होणार आहे या प्लांट चे उद्घाटन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र कोरगावकर , जिल्हा समिती सचिव सचिन मदने, नामदेव जांभेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण नारायण नाईक चंद्रसेन पाताडे, श्रीकृष्ण कांबळे, श्रीकृष्ण ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

loading image
go to top