
चिपळूण : मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या ६८०० मतांनी मागे पडलेल्या प्रशांत यादव यांना येत्या पाच वर्षांत भाजप पक्षाकडून ताकद दिली जाईल. त्याच्या जोरावर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातून ते आमदारही होतील, असा विश्वास मत्स्य व बंदर विभागाचे मंत्री नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केला. याचवेळी त्यांनी कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेतही दिले.