"कागदपत्रे वाचूही न शकणाऱ्या विनायक राऊतांकडून कोणतीच अपेक्षा नाही"

राजेश कळंबट्टे
Friday, 25 September 2020

टीका करण्यापेक्षा विनायक राऊतांनी खुलासा करावा - निलेश राणे

रत्नागिरी : भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी नाणार रिफायनरी संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं घेऊन त्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार, सर्वे नंबर, गट नंबर, हिस्सा नंबर पुराव्यासकट पत्रकार परिषदेत समोर सादर केले होते. मात्र विनायक राऊत यांनी टीकेच्या व्यतिरिक्त पुराव्यांबाबत कोणताच खुलासा केला नसून कागदही वाचू ना शकणाऱ्या विनायक राऊतांनी आधी खुलासा करावा, असे आव्हान भाजपा नेते,माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे.

नाणार रिफायनरी डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा नातेवाईक मावस भाऊ निशांत देशमुख आणि त्यांची कंपनी यांनी केलेलं व्यवहार, हे पुरावा सकट निलेश राणे यांनी पत्रकार परिषेद समोर ठेवले होते. शिवसेना पक्ष आणि खासदार विनायक राऊत यांच्या पोटातही दुखायला लागलं. आज जे काही मीडिया समोर येऊन विनायक राऊत बोलले मात्र त्यांनी कसलेही पुरावे सादर केले नाहीत. असा थेट प्रहार निलेश राणे यांनी केला आहे.

हेही वाचा- साखरीनाटे बंदरातून तारली, बांगडा गायब ; शिंगाळा झाला कमी -

श्री.राणे पुढे म्हणाले की,  जे काही मी कागदपत्रे सादर केलेत ते वाचायला लागतील, अभ्यास करायला लागतील. मात्र, विनायक राऊत कडून कोणतेही अपेक्षा ठेऊ नका, कारण ते दहावी नापास आहेत. दहावी नापास माणूस हे सगळं करू शकेल शक्य नाही. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मी जे काही सादर केलं होतं ते राऊतांनी खुलासा देखील केला नाही. टपोरी माणसं जसे उलटं-सुलट बोलतात तसे एक टपोरी खासदार विनायक राऊत मीडिया समोर बरगळत होते. एक खासदार कसा असावा याची ट्रेनिंग त्याना कुणी तरी दिली पाहिजे. मात्र ट्रेनिंग मातोश्री देईल की नाही माहिती नाही, असे राणे यांनी सांगितले. त्यातच आमच्याकडेही असे विनायक चहा आणण्यासाठी ठेवले आहेत असा उपहासात्मक टोलाही निलेश राणे यांनी हाणला.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader and former MP Nitesh Rane will hold a press conference on Nanar refinery