एक वेळ अशी येईल की मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेकडे नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

कणकवली : जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुरच्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील. असे ट्वीट करत भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र राज्यपालांना पाठविण्यात येणाऱ्या यादीत नेमकी नावे कोणाची आहेत, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ जागा एप्रिल ते जून या दरम्यान मुदत संपल्याने रिक्त झाल्या होत्या. राज्य सरकारकडून त्या जागांवर नियुक्त्यांसाठी काही नावे पाठविण्यात आली होती; परंतु संविधानातील तरतुदीकडे बोट दाखवत राज्यपालांनी विधान परिषदेवर राजकीय नियुक्त्या करण्यास नकार दिला

.
हेही वाचा- अतिउत्साहीपणा आला अंगलट ; चारचाकी गाडी फसली वाळुत, काढताना फुटला घाम -

 

 या  रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांची चर्चा सध्या रंगली आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधानपरिषेदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टिका करत निशाणा साधला.

दरम्यान, यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना उर्मिला मातोंडकरला पक्षाकडून उमेदवारी देण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “यासंदर्भात मीदेखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. मंत्रिमंडळात निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात मंत्रिमंडळाने अधिकार दिले आहेत.

एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील. असे ट्वीट करत भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टिका करत निशाणा साधला

संपादन - अर्चना बनगे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Nilesh Rane criticise for shivsena