शिवसेनेच्या आमदार खासदारांनी तिवरेवासीयांना चुना लावायचेच केले काम : निलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

सिद्धिविनायक ट्रस्ट ने दिलेले 5 कोटी कुठे गेले

भाजपा नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला संताप 

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. या एकवर्षात तिवरेतील ग्रामस्थांचे पुनर्वसन झालेले नाही. यावर भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला असून शिवसेनेच्या मंत्री, स्थानिक आमदार आणि खासदारांनी चुना जनतेला लावण्याचेच काम केल्याची टीका केली आहे. 

तिवरे धरण दुर्घटनेत मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती. संसार उध्वस्त झाले. 22 घरे, जनावरांचे गोठे वाहून गेले होते. 22 जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यासाठी एसआयटी नेमली आणि पुनर्वसन करण्याचे काम सुरू झाले. पण आज एक वर्षानंतरही शिवसेनेच्या आमदार आणि खासदारानि याकडे ढुंकूनही बघितले नाही.

हेही वाचा- मंडणगडात  ब्रेक द चेनला शंभर टक्के प्रतिसाद ; ११३ जणांवर नगरपंचायतीची दंडात्मक कारवाई...
 

इथल्या लोकांनां फक्त आश्वासने दिली. इथली 56 कुटुंब आज उघड्यावर पडली आहेत. त्यांना जिल्हा प्रशासनाने आधार दिला नाही. जिथे जागा दिली तिथे घरे बांधून दिली नाहीत. अहवालाचे काय झाले तेही समजू शकलेले नाही. या सर्व घडामोडीनंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी इथल्या लोकांच्या भावनेशी खेळणाऱ्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांवर रोष व्यक्त केला आहे. 

हेही वाचा- आरोग्य विभागापुढे निर्माण झाला नवा पेच ;  प्रयोगशाळेत आता असाही तुटवडा...

त्यानी ट्विटरवर देखील आपला संताप व्यक्त केला . शिवसेनेचे आमदार, खासदार आणि 2 पालकमंत्री असूनसुद्धा तिवरे येथील कुटुंब गेली एक वर्ष कंटेनर मध्ये राहत आहेत. सिद्धिविनायक ट्रस्ट ने दिलेले 5 कोटी कुठे गेले माहिती नाही. घर गेलं, शेत गेलं आणि कुटुंबातील लोकांचे जीवही गेले. शिवसेनेच्या आमदार खासदारांना कुटुंब उध्वस्त झाली तरी चालतील पण गोड बोलायचं आणि चुना लावायचंच काम ते करणार, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Nilesh Rane expressed anger