esakal | 'देवेंद्र फडणवीस यांच्या भीतीपोटी हे सरकार कोकणातील जनतेला निश्चितच मदत करणार'
sakal

बोलून बातमी शोधा

'देवेंद्र फडणवीस यांच्या भीतीपोटी हे सरकार कोकणातील जनतेला निश्चितच मदत करणार'

'देवेंद्र फडणवीस यांच्या भीतीपोटी हे सरकार कोकणातील जनतेला निश्चितच मदत करणार'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा (tauktae cyclone) फटका कोकणसह (kokan) किनारीपट्टीच्या भागांना बसला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड आणि पश्चिम महारष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. ताशी १५० वाऱ्याचा वेग आणि मुसळधार पडणार (heavy rain) पाऊस यामुळे किनारपट्टीवरील लोकांच्या मनात धडकी भरली. या भागातील घरांची पडझड, शेती फळबागांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. बागायतीसह आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्या क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. ठिकठीकाणी मंत्री आणि कृषी अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पंचनामा सुरु केले आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या (state government) मदतीच्या आश्वासनावरुन विरोधकांनी त्यांच्यावर निशाण साधला आहे.

(bjp MLA prasad lad criticized on aghadi sarkar damage of cyclone in konkan)

भाजपाचे आमदार प्रसाद (prasad lad) लाड यांनी ट्वीट करुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणतात, बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करू अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सत्तेत येण्यापूर्वी केली होती. मात्र ती अगदीच फोल ठरली आहे. आता मुख्यमंत्री दौरा करणार असतील तर त्यांनी आम्हालाही यात सहभागी करून घ्यावे, आम्ही त्यांना नक्कीच सहकार्य करू!.

तौक्ते चक्रीवादळामुळे मालवण, राजापूर, रत्नागिरी, पावस, दापोली, गुहागर आणि रायगड येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र गेल्या निसर्ग चक्रीवादळातही महाविकासआघाडी सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले आहे. अशी खोचक प्रतिक्रीया प्रसाद लाड यांनी यावेळी दिली.

पुढे ते म्हणतात, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) हे कोकणचा दौरा करत आहेत. एक अभ्यासू माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्तांचा आकडा मिडिया व जनतेसमोर ठेवतील. यांच्या भीतीपोटी हे सरकार कोकणातील जनतेला निश्चितच मदत करेल, अशी मला खात्री आहे, असेही त्यांनी ट्वीटमधून सांगितले आहे.

दरम्यान कोकणातील फलबागांसह आंबा आणि काजू बागायतदारांचे नुकसान झाले आहे. कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने सरकारने यावर लवकर योग्य तो निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

loading image