योद्धा पुन्हा मैदानात! राणेंच्या स्वागताची होर्डिंग झळकली

jan ashirwad yatra
jan ashirwad yatrasakal
Updated on: 

रत्नागिरी : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा राणेंना अटक, जामीन, सेना विरुद्ध राणे, भाजप अशा कारणांमुळे देशभर गाजली आणि दीड दिवस स्थगित करावी लागली. आता ही यात्रा आजपासून रत्नागिरी शहरातून सुरू होणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राणेंच्या स्वागताचे बॅनर्स विविध ठिकाणी झळकले असून, भाजप कार्यालयात त्यांचा जंगी सत्कार होणार आहे.

Summary

नारायण राणेंच्या स्वागतासाठी जिल्हा भाजपच्यावतीने जोरदार तयारी.

जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सकाळी रत्नागिरीत दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा भाजपच्यावतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. यांची आज सकाळपासून जन आशीर्वाद यात्राची सुरुवात मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून व पुष्पहार अर्पण करून होणार आहे. रत्नागिरीमध्ये जमाव बंदी आदेश असतानाही यात्रा होणार आहे. तसेच या यात्रेमुळे मारुती मंदिर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आलेले दिसत आहे.

jan ashirwad yatra
राणेंच्या यात्रेपूर्वीच शिवसेना पदाधिकाऱ्यांना नोटीस

मारुती मंदिर सर्कल आजूबाजूच्या परिसर संपूर्णपणे भाजपच्या झेंड्यांनी भाजपमय झालेला दिसत आहे. रत्नागिरी शहर व अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज संपूर्ण दिवस केंद्रीय मंत्र्यांचा रत्नागिरी शहरांमध्ये व्यस्त कार्यक्रम आहे. केंद्रीय मंत्री राणे आंबा बागायतदारांचे देखील चर्चा करणार आहेत. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा परत एकदा रत्नागिरीतून सुरु होणार आहे. दुपारी केंद्रीय मंत्री राणे यांची पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेत ते काही महत्त्वाचे वक्तव्य करणार का याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com