स्वाभिमान, शिवसेनेस रिफायनरी प्रकल्पासाठी जठारांचे भावनिक आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

सावंतवाडी - नाणारचा रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी - सिंधुदुर्गातच राहावा, यासाठी शिवसेना व स्वाभिमान पक्षास भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी विधानभवनासमोर भावनिक आवाहन केले. श्री. जठार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रकल्प रत्नागिरी - सिंधुदुर्गातच राहावा, असा आग्रह धरला.

श्री. जठार म्हणाले,  मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी विचारात घेऊन हा प्रकल्प कोकणाबाहेर जाऊ दिला नाही. तो कोकणातच ठेवला आहे. खरंतरं तो रत्नागिरी - सिंधुदुर्गात राहीला असता तर याच्यापेक्षा जास्त आनंद झाला असता. 

श्री. जठार म्हणाले, शिवसेना व स्वाभिमान पक्षाने या प्रकल्पाचा अभ्यास करावा. या प्रकल्पाची माहिती घ्यावी, पर्यावरणास घातक नसणारा हा प्रकल्प रत्नागिरी - सिंधुदुर्गातच व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. या प्रकल्पामुळे हजारोंना रोजगार मिळेल. पुढच्या पिढीसही रोजगार मिळेल. याचा  विचार करावा. आता हा प्रकल्प रायगडला होऊ घेतला आहे. तरी तो सिंधुदुर्ग - रत्नागिरीतच राहावा यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन श्री. जठार यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP president Pramod Jathar comment on Nanar refinery project