esakal | Good News : रत्नागिरीत भाजप उभारणार कोविड सेंटर; बाधितांना मोठा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Good News : रत्नागिरीत भाजप उभारणार कोविड सेंटर; बाधितांना मोठा दिलासा

Good News : रत्नागिरीत भाजप उभारणार कोविड सेंटर; बाधितांना मोठा दिलासा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : कोविड स्थिती (covid-19 condition) लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी (BJP) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये (ratnagiri district) 4 कोविड सेंटर (covid centre) सुरू करणार असून ऑक्‍सिजन बॅंकही उभारणार आहे. जिल्हाधिकारी (ratngiri collector) यांच्याबरोबर झालेल्या ऑनलाइन बैठकीनंतर भाजपने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू करण्यात येणारी ही कोविड सेंटर प्रत्येकी 35 ते 50 बेडची अन सुसज्ज असतील.

आमदार प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, (nilesh rane) जिल्हासरचिटणीस सचिन व्हाळकर व राजेश सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचेसह ऑनलाईन बैठक केली. त्या बैठकीमध्ये कोविड सेंटर उभारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. तसेच प्रसाद लाड हे 50 ऑक्‍सिजन (oxygen) कॉन्सट्रेटर जिल्ह्याला बुधवारी (19) जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द करणार असून त्या माध्यमातून ऑक्‍सिजन बॅंकेची उपयुक्त संकल्पना राबवण्यात येणार आहे.

हेही वाचा: Tauktae Cyclone चा रत्नागिरी, सिंधुदुर्गाला तडाखा

2 ऍम्बुलन्सही भाजपासाठी अंत्योदय प्रतिष्ठान व 'मी मुंबई अभिमान' या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहेत, असे लाड यांनी सांगितले. माजी खासदार राणे यांनी जिंदल कंपनीच्या माध्यमातून भाजप एक अतिरिक्त ऑक्‍सिजन टॅंक सप्लाय करणार असून त्यासही तांत्रिक मंजुरी द्यावी, अशी मागणी राणे यांनी केली. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लाड आणखी एका हॉस्पिटलला त्यांच्या सीएसआरमधून 20 व्हेंटिलेटर बेड तसेच ऑक्‍सिजनसह 1 ऑक्‍सिजन युनिट देऊन 100 बेडचे सुसज रुग्णालय सुरू करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यानी या विषयास तात्काळ मंजुरी देऊ असे या बैठकीत स्पष्ट केले. कोव्हिड परिस्थितीमध्ये कोणतेही राजकारण न करता संपूर्ण सहकार्य भाजपा करेल, असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

ऑक्‍सिजन बॅंक'संकल्पनेचे स्वागत

'ऑक्‍सिजन बॅंक' ही नवीन संकल्पना येथे उत्तम पद्धतीने राबवू. तसेच तज्ञ डॉक्‍टरही आवश्‍यक आहेत. ही उपलब्धता महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगत आपण मांडलेल्या सर्व प्रस्तावांना तत्काळ मंजूरी देऊ, असे स्पष्ट आश्‍वासन बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिले.

हेही वाचा: 'तू फिरकीपटू आहेस, धाडसी असायला हवं'; सांगलीच्या तरणजीतला धोनीचा गुरुमंत्र