कोकणात तटकरे भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 August 2019

रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीत भाजप - सेनेची युती 100 टक्के होईल. युती अभेद्यच आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीचे जहाज बुडू लागल्याने अनेकजण भाजप - सेनेत उड्या मारू लागले आहेत. रत्नागिरीत गळाला लागणारा एखादाच मासा आहे. कोकणात तटकरे संपर्कात आहेत, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पण कोणते तटकरे याचा खुलासा मात्र श्री. लाड यांनी केला नाही. ते म्हणाले, कोण येणार आहे, हे आता जाहीर कसे करणार? योग्यवेळ आल्यावरच ते जाहीर करू. 

श्री. लाड रत्नागिरी दौऱ्यावर असून त्यांनी आज रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातील बूथ, शक्ती केंद्रप्रमुखांच्या मेळाव्यांनतर पत्रकार परिषद घेतली. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन व शिवसेनेचे तीन आमदार आहेत. सध्याचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा अनेक दिवस सुरू आहेत. यासंदर्भात लाड यांनी सूचक विधान केले. 

पश्‍चिम महाराष्ट्रात 2000 गणेशमूर्तींचे वितरण व कोकणात 1000 मूर्तींचे वितरण पूरग्रस्तांना करण्यात येणार आहे. चिपळूण येथे काल प्रातिनिधिक मूर्तींचे वितरण केले. नदीपात्रातील गाळ काढल्यास पूराचा धोका कमी होतो. गाळ काढण्याकरीा नदीजवळच्या 4-5 ग्रामपंचायतींकडून एनओसी घ्यावी लागते. संवादाअभावी ही प्रक्रिया वेळेत होत नाही. यासाठी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये ज्या ठिकाणचा गाळ काढायचा आहे, त्यांच्या बैठका घेऊन संवाद साधला जाईल. पूररेषेमध्येसुद्धा बांधकांमानाही परवानगी दिली जाते. पूररेषेत असणाऱ्या रहिवाशांनी काळजावर दगड ठेवून घर सोडावे, शासन त्यांना घरभाडे देई, पुनर्वसन करेल. 

कारूळ गाव दत्तक घेणार 
गुहागर तालुक्‍यातील कारूळ गावातील 38 घरे भूस्खलनामुळे बाधित आहेत. हे गाव अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून दत्तक घेण्याचा विचार असून मंगळवारी (ता. 27) जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्यात निर्णय घेणार असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले. 

प्रसंगी रत्नागिरीतून लढण्यास तयार 
निवडणुकीत युतीचा विजय निश्‍चित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील, असे ठामपणे सांगितले. जर युती झाली नाही तर काय,यावर त्यांनी आम्ही सर्व जागा लढवू असे सांगत प्रसंगी मी रत्नागिरीत निवडणूक लढवेन, असे स्पष्ट केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state Vice President MLA Prasad Lad comment