मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही ; चित्रा वाघ यांचा इशारा

मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही ; चित्रा वाघ यांचा इशारा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाबरोबरच आता ओबीसी राजकीय आरक्षण हे केवळ रद्द होण्यामागे नाकर्ते महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. या सरकारच्या विरोधात त्यांना जाग येण्यासाठी राज्यात 1000 ठिकाणी भाजपाच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज संघटना 26 जूनला चक्का जाम आंदोलन करणार आहे. तात्काळ या बाबत निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रात निवडणूका होऊ देणार नाही. मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. असा इशारा यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.(bjp-women-vice-president-chitra-wagh-visit-of-sindhudurg-district-obc-reservation)

ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ या आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. सुरुवातीला त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत पक्ष पदाधिकारी बरोबरच भंडारी समाज, दैवज्ञ समाज, परीट समाज, तेली समाज, गाबीत समाज, वैश्य समाज या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. 26 जूनच्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाबाबत दिशा ठरवण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे.

भाजप पक्षाचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागायला आलेला असतानाच महाविकास आघाडीला कोणतेही सोयर-सुतक नसल्यामुळे या मिळणाऱ्या आरक्षणा बरोबरच आता ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्याला सर्वस्वी नाकर्ते सरकार जबाबदार आहेत म्हणूनच आम्ही या सरकारला जाग येण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 26 जूनला राज्यात 1000 ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार आहोत.

राजकीय आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय न घेतल्यास आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही. नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. रस्त्यावर येऊन नाटक करण्यापेक्षा मंत्रालयात बसून या आरक्षणाबाबतचा आढावा घेतला पाहिजे होता. मात्र आघाडी सरकार काहीच करू शकले नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. मराठा व ओबीसी राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या भूमिकेत आहोत.

महाराष्ट्र राज्यात या आंदोलनात भाजपा पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समाज संघटना या सक्रिय सहभागी होणार आहेत. यावेळी जिल्हा अध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर, राजन म्हापसेकर, प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, राजू राऊळ, गजानन वेंगुर्लेकर, श्रीपाद चोडणकर, दिलीप भालेकर, दादा केळुसकर, राजन गिरप, आनंद नेवगी, अविनाश पराडकर, मोहिनी माडगावकर, शरद चव्हाण, विनायक राणे, दीपक नारकर, राकेश कांदे, विवेक माडकुलकर, बंड्या सावंत, सुनील बांदेकर, ओबीसी समाज पदाधिकारी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत भाजपाने नेतृत्व केले असून या 26 जून ला होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज यामध्ये सहभागी होणार आहे. 26 ला सकाळी दहा वाजता सिडको ऑफिस ओरोस येथे ओबीसी आक्रोश आंदोलनाला कोरोना नियमांच्या अधीन राहून सुरुवात होणार आहे. आज पासून त्याच्या नियोजनाच्या बैठका सुरू झाल्या असल्याचे भाजपा नेते अतुल काळसेकर यांनी सांगितले.

.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com