सिंधुदुर्गात रक्‍तदान एक चळवळ

blood donation camp in sindhudurg national blood donation camp organised by district
blood donation camp in sindhudurg national blood donation camp organised by district

सिंधुदुर्ग : पहिला रक्तदान दिन १९७५ मध्ये इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन ॲण्ड इम्युन्यूजॉलॉजी या संस्थेने केला. या संस्थेचे संस्थापक सदस्य श्रीमती के. स्वरूप कृष्णा आणि जे.जी. जॉली हे होते. त्या वर्षीच्या स्वैच्छिक रक्तदान दिनाचे बोधवाक्‍य होते डोनेट ब्लड, इट्‌स अबाऊट लाईफ म्हणजेच रक्तदान करा, हे जीवनासाठी (जीवदान देण्यासाठी) आवश्‍यक आहे. .

जिल्हा रुग्णालयात २००० मध्ये रक्तपेढी विभाग कार्यान्वित झाला आहे. रक्तपेढी विभागामध्ये २०१० मध्ये रक्त विघटन केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे प्लेटलेटसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय कणकवली, शिरोडा व ग्रामीण रुग्णालय देवगड या ठिकाणी रक्त साठवण केंद्राची स्थापना केली आहे. जिल्ह्यामध्ये दरवर्षी अंदाजे ५ हजार रक्त बॅगा रक्तदान मोहिमेतून संकलित होतात. जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२० या कालावधीत ६६ रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून ३ हजार ३६८ रक्तबॅगा संकलित केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतून शासकीय व खासगी रुग्णालयांना Whole Blood, PVC, Platelet व FFP (Plasma) या रक्त व रक्त घटकांचा महिन्याला सरासरी ५०० ते ५५० एवढा पुरवठा करण्यात येतो.

या आहेत सुविधा

- निरोगी रक्तदात्यांमार्फत घेतलेल्या रक्ताचा पुरवठा
- हिमोफेलिया व थॅलेसिमिया रुग्णांना मोफत रक्त 
- स्वैच्छिक रक्तदान कार्डवर मोफत रक्तपुरवठा
- शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या       रुग्णांना मोफत रक्त व रक्त घटकांचा पुरवठा 
- दुर्मिळ रक्तदात्यांशी संपर्क साधून रक्ताची उपलब्धता
- एकावेळी ८ ते १० रक्त पिशव्यांचा तत्काळ पुरवठा

असे चालते संकलन

रक्तदात्यास कोणताही जंतूसंगर्ग होऊ नये म्हणून सर्व निर्जंतुकीरणाची काळजी घेऊन प्रशिक्षित व्यक्तीकडून रक्त काढून घेतले जाते. एकावेळी ३५० ते ४५० मिलिलीटर सायट्रेट फॉस्फेट डेक्‍सट्रोज अडेननाईन (सी.पी.डी.ए.) हे द्रावण वापरतात. रक्त पेढीमध्ये रक्तावर विविध प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात त्यामध्ये रक्तदात्याची रक्तगट तपासणी, आर एच डी प्रकार पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे पाहिले जाते. एचआयव्ही तपासणी केली जाते. रक्तबॅगेवर ए, बी, या प्रकारे ज्या रक्तगटाचे रक्त आहे, त्याचे लेबल लावले जाते. या रक्ताच्या बॅगा शीतगृहात २ सेंटीग्रेड तापमानात ठेवल्या जातात. शीतसाखळी व्यवस्थित राखली जाते. संगणकाव्दारे ती नियंत्रित केली जाते. त्यासाठी सेंट्रल मॉनिटर युनिटचा वापर केला जातो.
 

तुम्हीही रक्तदाते

अठरा वर्षे पूर्ण झालेली निरोगी व्यक्ती रक्तदान करु शकते. साधारणपणे ५० अथवा शारीरिक स्थिती सुदृढ असेल तर ६० वर्षांपर्यत ती व्यक्ती रक्तदान करू शकते. दोनदा लागोपाठ रक्त देताना त्यामध्ये तीन महिने कालावधी इतके अंतर असावे. रक्तदात्यास गंभीर आजार असू नये. त्याचे वजन कमीत कमी ५० किलोग्रॅम असावे. रक्तामधील हिमोग्लोबीनचे १२.३ स्त्रियांसाठी तर १३ ग्रॅम डीसी मीटर पुरुषांसाठी प्रमाण असणे गरजेचे आहे.

ग्रीन कार्ड योजना

स्वैच्छिक रक्तदात्याची रक्तदानाची दखल घेऊन राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई यांनी किमान चारवेळा रक्तदान केले आहे, अशा रक्तदात्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना गरजेच्या वेळी प्राधान्याने आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रीन कार्ड देते. सरकारी, निमसरकारी रुग्णालयात उपचारासाठी ग्रीन कार्डधारक रक्तदात्यांना त्या रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या उपचाराच्या सर्व सुविधा त्यांना रांगेत उभे राहण्याची सक्ती न करता नियमानुसार अग्रक्रमाने विनाविलंब करुन देण्यात येतील. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com