खवळलेल्या समुद्रात दहा वावात नौकेचं इंजिन पडलं बंद अन्...

साडेतीन हजार नौकांपैकी दोन ते तीन टक्केच नौका मासेमारीसाठी रवाना झालेल्या होत्या.
खवळलेल्या समुद्रात दहा वावात नौकेचं इंजिन पडलं बंद अन्...
Updated on

रत्नागिरी : बंदी कालावधी संपुष्टात आल्यामुळे अनेक मच्छीमार (fisherman) धोका पत्करुन समुद्रावर स्वार झाले आहेत. पहिल्याच दिवशी दुर्घटना घडता, घडता टळली. साखरतर येथील एका नौकेचे इंजिन दहा वावात अचानक बंद पडले. एकीकडे खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे वेगवान वारा या कचाट्यात सापडलेली नौका सावरत सावरत वरवडे किनाऱ्‍यावर लागली. सुदैवाने धोक्यात गेलेल्या नऊ खलाशांचा जीव वाचला. (ratnagiri update)

मासेमारी बंदीचा कालवधी ३१ जुलैला संपुष्टात आल्यानंतर ट्रॉलिंग, गिलनेटसारख्या नौका मासेमारीसाठी सरसावल्या. पहिल्या टप्प्यात मासळी चांगली मिळत असल्यामुळे त्यावर फायदा मिळण्याची आशा दरवर्षी मच्छीमारांना असते. रविवारी (१) सकाळी अनेक मच्छीमारी नौकांनी उसळलेल्या लाटांवर स्वार होत खोल समुद्र गाठला. साडेतीन हजार नौकांपैकी दोन ते तीन टक्केच नौका मासेमारीसाठी रवाना झालेल्या होत्या. त्यात साखरतर येथील एका मच्छीमाराची नौकाही होती.

खवळलेल्या समुद्रात दहा वावात नौकेचं इंजिन पडलं बंद अन्...
मेहनतीने उभारलेला संसार क्षणांत डोळ्यांसमोर नाहीसा झाला

सकाळी मासेमारीसाठी बाहेर पडलेली नौका दहा वाव समुद्रात जाळं टाकून होती. खवळलेल्या समुद्रात अचानक नौकेचे इंजिन बंद पडले. वेगाने वाहणाऱ्‍या वाऱ्‍याबरोबर नौका भरकटू लागली. त्या नौकेवर नऊ खलाशी होते. वारा आणि लाटांबरोबर ती भरकटत वरवडे किनाऱ्‍यावर येऊन विसावली. सुदैवाने मोठी दुर्घटना पहिल्याच दिवशी टळल्याची चर्चा मच्छीमारांमध्ये सुरू होती.

पाण्यालाही प्रचंड करंट

वातावरण बिघडल्यामुळे किनाऱ्‍यावर वेगाने वारे वाहत आहेत. समुद्र खवळलेला असून पाण्यालाही प्रचंड करंट आहे. या परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून मच्छीमार समुद्रात जात आहेत. सध्या प्रत्येक नौकेला शंभर ते दीडशे किलो कोळंबी मिळत असल्याचे मच्छीमार सांगत आहेत. किलोला दोनशे ते अडीचशे रुपये दर सहज मिळतो.

"वातावरण खराब आहे. काही मोजकेच मच्छीमार समुद्रात जात आहेत. सोमवारी (ता. ३) किनारपट्टीवर वादळाचा इशारा आहे."

- आप्पा वांदरकर, मच्छीमार.

खवळलेल्या समुद्रात दहा वावात नौकेचं इंजिन पडलं बंद अन्...
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; चौथ्या खेमसावंतांची स्वतंत्र कारकीर्द

एक नजर..

  • मासेमारी बंदीचा कालवधी ३१ जुलैला संपुष्टात

  • ट्रॉलिंग, गिलनेटसारख्या नौका सरसावल्या

  • मच्छीमारी नौका समुद्रात; गाठला खोल समुद्र

  • साखरतरमधील नौकाही मासेमारीसाठी बाहेर

  • दहा वाव समुद्रात जाळं टाकले; समुद्र खवळला

  • अचानक नौकेचे इंजिन बंद; वाऱ्‍याबरोबर नौका भरकटली

  • वरवडे किनाऱ्‍यावर विसावली; टळली मोठी दुर्घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
Marathi News Esakal
www.esakal.com