मेहनतीने उभारलेला संसार क्षणांत डोळ्यांसमोर नाहीसा झाला

पुराने त्यांचे सर्वस्वच हिरावले, यात सुमारे पंचवीस लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मेहनतीने उभारलेला संसार क्षणांत डोळ्यांसमोर नाहीसा झाला

रत्नागिरी : चिपळूण (chiplun Flood) कळकवणे-दादर येथील तिरमैना आणि वैतरणा नदीच्या रुद्रावतारात एका माजी सैनिकाचा (army man) मेहनतीने उभारलेला संसार डोळ्यांसमोर काही क्षणांत वाहून गेला. घर, सोन्यानाण्यासह दागिने आणि सगळा संसारही वाहून गेला. देशाच्या सीमेवर बाजी लावणारे दादर (dadar) येथील माजी सैनिक दिनेश बाबू सकपाळ यांच्यावर हा प्रसंग ओढवला. पुराने त्यांचे सर्वस्वच हिरावले. यात सुमारे पंचवीस लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सकपाळ यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधत धीर दिला. दादर गावाजवळच तिरमैना आणि वैतरणा नदीचा संगम. २२ जुलैला दोन्ही नद्यांच्या पुराने सर्वच किनारा गिळंकृत केला. किनाऱ्यापासून पाचशे फुटापेक्षाही अधिक अंतरावर सकपाळ यांचे १९९८ ला बांधलेले घर होते. तेथे ते पत्नी, दोन मुलांसह राहत होते. आतापर्यंत पाणी घरापर्यंत कधीच आले नसल्याने घरातले सर्व निर्धास्त होते. दुपारनंतर अचानक पाणी वाढले आणि घरात शिरू लागले. ग्रामस्थांच्या मदतीने ते सर्व सुखरुपपणे बाहेर आहे.

मेहनतीने उभारलेला संसार क्षणांत डोळ्यांसमोर नाहीसा झाला
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; चौथ्या खेमसावंतांची स्वतंत्र कारकीर्द

वाढलेल्या पाण्यामुळे घरातील सर्व साहित्य तिथेच टाकून सकपाळ कुटुंबाला बाहेर पडावे लागले. टीव्ही, फ्रिज, कपडेलत्ते यासह सोन्याचे दागिनेही घरात राहिले. लाटांवर लाटा उसळत घरावर आपटत होत्या. वेगवान प्रवाहापुढे कौलारू घर टिकाव धरू शकले नाही. अवघ्या वीस मिनिटांत ते कोसळले. यामुळे सकपाळ कुटुंबीयांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. त्यांना ग्रामस्थ दिलासा देत होते. पूर ओसरला, पण जागेवर घर नव्हते. फक्त उरल्या होत्या त्या आठवणी. सध्या ते नातेवाईकांकडे राहत आहेत. प्रशासन पंचनामे करत असून त्यांचे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

"इतक्या वर्षांत कधीच एवढे पाणी आलं नव्हते. पाणी वाढू लागल्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी गेलो; पण पुरात सगळंच वाहून गेलं."

- दिनेश सकपाळ, माजी सैनिक

"दुपारी अचानक नदीचे पाणी वाढले. सकपाळ कुटुंबीयांना ग्रामस्थांनी बाहेर काढले. माझ्या पन्नास वर्षांच्या पाहण्यात एवढं पाणी कधीच आलेले नव्हते. अवघा गाव सकपाळांना धीर देत आहे."

- विलास सकपाळ, माजी सदस्य, कळकवणे

मेहनतीने उभारलेला संसार क्षणांत डोळ्यांसमोर नाहीसा झाला
राधानगरी धरणाच्या अत्याधुनिक दरवाजांची योजना मार्गी लागण्याची शक्यता

सकपाळ यांची सैन्यातील कारकीर्द

  • दिनेश बाबू सकपाळ १९८२ ला सैन्यदलात नोकरीस लागले

  • सेकंड मराठा बटालियनमध्ये ते कार्यरत होते

  • काश्मीरमध्ये बॉर्डरवर दोन वेळा त्यांची नियुक्ती

  • नाईक पदावरून ते १९९८ ला सेवानिवृत्त झाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com