सेक्‍स रॅकेटप्रकरणी दोघांना आणखी दोन दिवस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 March 2021

बंगल्यामध्ये बेकायदेशीर मुलींना ठेऊन "सेक्‍स रॅकेट" चालवित होते

रत्नागिरी - शहरातील ओसवालनगर येथे एका बंगल्यात चालणाऱ्या "सेक्‍स रॅकेट" प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या संशयितांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पद्मीनबाई तुकाराम बादलवाड (वय 43, रा. सोलापूर), शिवाजी आनंदराव पाटील (वय 58, रा. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.

 ही घटना 25 फेंब्रुवारीला सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास सन्मित्रनगर येथील ओसवालनगर येथे घडली होती. संशयितांनी ओसवालनगर येथे एका बंगल्यामध्ये बेकायदेशीर मुलींना ठेऊन "सेक्‍स रॅकेट" चालवित होते. याची गुप्त माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी बोगस गिऱ्हाईकाद्वारे या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी धारावी-मुबई येथील एका पिडित मुलीसह दोघां संशयितांना अटक केली होती. तपास शहर पोलिस निरीक्षक अनिल लाड करत होते. संशयितांना अटक केल्यानंतर न्यायालयाने सोमवारी (ता. 1) पर्यत पोलिस कोठडी सुनावली होती.

हे पण वाचा -  शिक्षिका पॉझिटीव्ह; १२० विद्यार्थी क्वारंटाईन

दरम्यान पोलिसांनी तपासात या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यास सुरवात केली आहेत. सेक्‍स रॅकेटमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. तसेच दोघां संशयितांवर परजिल्ह्यातही गुन्हे दाखल असल्याचे पुढे आले आहे. सेक्‍स रॅकेट चालवताना संशयित रत्नागिरीत वास्तव्यात असताना कोणाकोणाशी संपर्क साधला, तसेच किती पीडित मुलींना या व्यवसायात बळी पाडले याचा कसून तपास पोलिस करत आहेत. संशयितांना आज पुन्हा न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने बुधवारी (ता.3) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

 संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both jailed for two more days in sex racket case ratnagiri