esakal | कोल्हापूर : जयसिंगपूरमध्ये शिक्षिका पॉझिटीव्ह; १२० विद्यार्थी क्वारंटाईन

बोलून बातमी शोधा

teacher corona report positive in kolhapur jaysingpur }

पती पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिक्षिकेनेही आपले स्वॅब तपासणीसाठी दिले होते

कोल्हापूर : जयसिंगपूरमध्ये शिक्षिका पॉझिटीव्ह; १२० विद्यार्थी क्वारंटाईन
sakal_logo
By
गणेश शिंदे

जयसिंगपूर : शहरातील एका शाळेतील शिक्षिका कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. यामुळे अकरावी, बारावीचे वर्ग सोमवारपासून बंद ठेवण्यात आले. अन्य शिक्षकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून मंगळवारी २० शिक्षक व १२० विद्यार्थ्यांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईच्या सूचना पालिका आणि आरोग्य प्रशासनाने दिल्या आहेत. यामुळे शहरातील शाळांमध्ये खळबळ उडाली असून शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 संबंधित शिक्षिका कोल्हापुरात वास्तव्यास आहे. तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यापाठोपाठ शिक्षिका पत्नीही पॉझिटीव्ह आढळली. तत्पूर्वी शुक्रवारी, शनिवारी त्यांनी अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवले. पती पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिक्षिकेनेही आपले स्वॅब तपासणीसाठी दिले होते. रविवारी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शाळेत एकच धावपळ उडाली. शाळेतील शिक्षकांचे तातडीने स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर शुक्रवारी, शनिवारी वर्गात असणाऱ्या अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन विद्यार्थी, पालकांनाही याबाबत कल्पना देऊन त्यांना क्वॉरंटाईन होण्याच्या सूचना दिल्या.

मंगळवारी विद्यार्थ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जाणार असून पालकांचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील शाळांमध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे. शहरात दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाला प्रारंभ झाल्यानंतर बाहेरुन आलेल्या पती, पत्नीसह मुलाला कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या निम्म्यावर आली असताना शिक्षिकेला लागण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याने पुन्हा भीतीत भर पडली आहे.

हे पण वाचाGood News :नव्या शिक्षकांना बीएलओचे आदेश ; दहा वर्षाच्या कामातून मुक्तता

मुख्याध्यापकाचा बेजबाबदारपणा

शिक्षिका पॉझिटीव्ह आढळल्यानंतरही मुख्याध्यापकांनी ही गंभीर बाब प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा नगरपालिकेला वेळेत कळविली नाही. घटनेची माहितीॉच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर यांनी स्वत: मुख्याध्यापकांना विचारणा करुन त्यांना धारेवर धरले. शिक्षिका पॉझिटीव्ह आढळले, विद्यार्थी क्वॉरंटाईन असतानाही याबाबत प्रशासनाला कळविले नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांचा बेजबाबदारपणाही उघड झाला.

 संपादन - धनाजी सुर्वे