esakal | ब्राझील स्ट्रेनचा राज्यात शिरकाव: रत्नागिरीत आरटीपीसीआर अनिवा

बोलून बातमी शोधा

ब्राझील स्ट्रेनचा राज्यात शिरकाव: रत्नागिरीत आरटीपीसीआर अनिवार्य
ब्राझील स्ट्रेनचा राज्यात शिरकाव: रत्नागिरीत आरटीपीसीआर अनिवार्य
sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोना विषाणूचा ब्राझिल स्ट्रेन विदर्भातून राज्यात पसरला आहे. तो थेट शरीरातील फुफ्फुसावर परिणाम करतो. त्यामुळे वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर गंभीर परिणाम होतात. कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी वाहतुकीवरही निर्बंध आणले आहेत. आंतरजिल्हा प्रवासासाठी आजपासून पोलिसांकडुन इ-पास सक्तीचे करण्यात आले आहेत. जिल्ह्याबाहेर जाण्यास किंवा जिल्ह्यात येणार्‍यांसाठी आरटीपीसीआर अनिवार्य आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, जिल्हा प्रशासनाने 3 हजार 052 बेड उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हा कोविड रुग्णालय 549, कोविड हेल्थ केअर सेंटर 574, सीसी (सौम्य रुग्ण असलेले) 1 हजार 884 एवढे बेड उपलब्ध आहेत. तसेच 73 ऑक्सिजन बेड आहेत. रत्नागिरीचा ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू झाला आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे. अन्य पाच ठिकाणीही ऑक्सिजन सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी निधी मंजूर आहे.

50 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरण्याचा प्लॅन्टही लवकरच सुरू केला जाणार आहे. जिल्ह्यात रुग्णवाहिकेचा प्रश्‍न होता, मात्र तो खनिकर्म विभागाकडुन खरेदी केल्या जात आहेत. त्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आठ दिवसात खरेदी प्रक्रिया पुर्ण होईल. तसेच नवीन 25 व्हेंटिलेटर बेड तयार करण्यात येणार आहेत. इ-पास सेवा आजपासून सुरू केली आहे. तसेच मुंबईहुन येणार्‍यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. 72 तासापुर्वीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

* जिल्ह्यात लसीचा तुटवडा

* दोन दिवस लसीकरण बंद होण्याची शक्यता

* 1 लाख 35 हजार 039 जणांचे लसीकरण

* 1 लाख 14 हजार 244 पहिला डोस

* 30 हजार 745 दुसरा डोस देण्यात आला.

* लस वाया जाण्याचे प्रमाण 2.07 आले.

नवीन कोरोना चाचणी प्रयोग शाळेचा प्रस्ताव

कोरोना चाचणीचे प्रमाण वाढले आहे. कोरोना चाचणी अहवाल प्रयोगशाळेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे चाचणीचे अहवाल मिळण्यास चार ते पाच दिवस विलंब होत आहे. म्हणून नवीन कोरोना चाचणी प्रयोग शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

Edited By- Archana Banage