esakal | अलोरेतील व्यापारी संतप्त; "गळ्यातील चेन मोडायला लावणारे "ब्रेक दी चेन'' 
sakal

बोलून बातमी शोधा

Break the chain impact on covid 19 konkan latest newsBreak the chain impact on covid 19 konkan latest news

कोरोना महामारीच्या संकटाने गेल्यावर्षी लॉकडाउन केले गेले आणि यात सर्वच क्षेत्रातील छोटे-मोठे व्यावसायिक भरडले गेले. हातावरचे पोट असणाऱ्यांना उपासमारीची झळ सोसावी लागली.

अलोरेतील व्यापारी संतप्त; "गळ्यातील चेन मोडायला लावणारे "ब्रेक दी चेन'' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : गळ्यातली चेन मोडायची वेळ आली आहे आणि कसले ब्रेक दी चेन म्हणत अलोरेतील व्यापाऱ्यांसह सामान्यजनही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे संताप व्यक्त करीत आहेत. कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी सर्व सरकारसोबत आहोत; मात्र त्याला दुकाने बंद हा पर्याय नाही. अधिक कडक निर्बंध लादावेत, असा सूर व्यापाऱ्यानी लावला आहे. 


याबाबत माहिती देताना अलोरेतील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनीष गांगण म्हणाले, कोरोना महामारीच्या संकटाने गेल्यावर्षी लॉकडाउन केले गेले आणि यात सर्वच क्षेत्रातील छोटे-मोठे व्यावसायिक भरडले गेले. हातावरचे पोट असणाऱ्यांना उपासमारीची झळ सोसावी लागली. तो काळ आठवून आजही शहारे येत आहेत. यावर्षी पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट ओढवले आहे. यावर उपाय म्हणून सरकारने "ब्रेक दी चेन'द्वारे महिनाभर अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाविरुद्ध तालुक्‍यातील सर्व व्यापारी, विविध घटकांमधील लोक संतापले आहेत. चिपळूण शहरासह विविध भागातील व्यापारी संघटना, छोटे-मोठे व्यावसायिक एकवटले असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहेत. सरकारने सहानुभूतीने निर्णय घेऊन दिलासा द्यावा, असा सूर उमटू लागला असल्याचे गांगण यांनी सांगितले. 

हेही वाचा- रत्नागिरीत लसीचा तुटवडा; नियमित लसीकरण बंद, 1100 डोस दुसर्‍या टप्प्यासाठी
 

कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी आम्ही सर्वजण सरकारच्या सोबत आहोत; मात्र त्याला दुकाने बंद ठेवणे हा पर्याय न ठरवता अधिक कडक निर्बंध लादावेत. काही काळ का होईना दुकाने सुरू ठेवावेत. व्यापार क्षेत्रासह सर्वसामान्यांनाही दिलासा द्यावा. 
-मनीष गांगण, अध्यक्ष, अलोरे व्यापारी संघटना 

आम्हाला लॉकडाउन कोणालाच नको आहे; मात्र वाढती गर्दी कोरोनाला मारक ठरत आहे. यावर प्रशासनाने कडक निर्बंध घालावेत. व्यापारांनाही खबरदारीचे आदेश द्यावेत. लॉकडाउन करून सरकारने सामान्य लोकांचे हाल करू नयेत. 
-दत्ता कदम, अलोरे व्यावसायिक 
 


संपादन- अर्चना बनगे

loading image