सावंतवाडी : आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराला मुलगाच हवा ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आता परिवर्तित होत असून, सातार्डा जाधववाडीत एका मुलीनेच सकाळी गणिताचा दहावीचा पेपर लिहून दुपारी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सातार्डा जाधववाडीतील सौ. रुपाली राजन जाधव (वय ४८) यांचे रविवारी (ता. १०) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती आणि दोन मुलीच असल्याने त्यांचा अंत्यसंस्कार विधी कोणी करायचा? असा प्रश्न निर्माण झाला होता.