esakal | लाच घेताना तलाठी जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

लाच घेताना तलाठी जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लाच घेताना तलाठी जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : मृत्यू झालेल्या आईचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करून सातबारा उतारा (satbara utara) देण्यासाठी 1500 रुपयांची लाच (bribe) स्वीकारणाऱ्या तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास निवळी येथील तलाठी (talathi) कार्यालयात करण्यात आली. राजेश इंदल गुसिंगे (37, रा. खेडशी, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. (ratnagiri) त्याच्या विरोधात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी नुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मृत आईच्या नावे संयुक्तिक नावाने भोके गावात जमीन आहे. तक्रारदाराने निवळी येथील तलाठी कार्यालयात मृत्यू झालेल्या आईचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करून सातबारा उतारा देण्यासाठी अर्ज केला होता.

हेही वाचा: लाच स्विकारतांना उपलेखापालासह तलाठी जाळ्यात; आजऱ्यातील घटना

तेव्हा तलाठी राजेश गुसिंगे याने त्यांच्याकडे 2 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 1500 रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान, तक्रारदराने 2 जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पडताळणी करून लाचेची 1500 रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून राजेश गुसिंगेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण कदम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलिस हवालदार विशाल नलावडे, पोलिस नाईक दीपक आंबेकर, पोलिस शिपाई गावकर यांनी केली.

loading image