
Chiplun Bridge News : पिंपळी-नांदिवसे रस्त्यावरील नदीवर ६० वर्षांपूर्वी बांधलेला पूल शनिवारी रात्री अचानक खचल्याने दसपटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. पेढांबे येथील जिल्हा परिषद मार्गावरून सध्या वाहतूक वळविली आहे. शनिवारी रात्री हा पूल कोसळल्याची अफवा पसरली. त्यामुळे नागरिकांना सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेची आठवण झाली. आज सकाळी नागरिकांनी पाहिल्यानंतर हा पूल कोसळला नसून, खचल्याचे समोर आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद केली.