esakal | ‘अतिरिक्त लोटे एमआयडीसी’त उद्योग आणा
sakal

बोलून बातमी शोधा

midc lote

‘अतिरिक्त लोटे एमआयडीसी’त उद्योग आणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण: अतिरिक्त लोटे एमआयडीसीत उद्योग यावेत, अशी मागणी केंद्रीय सूक्ष्म, लघू उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे लोटे परशुराम उद्योजक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. येथील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत लोटे पशुराम असोसिएशनकडून राणे यांना निवेदन देण्यात आले.

केंद्रीय पर्यावरण विभागाने पर्यावरण क्लीअरन्सची अट घातल्यामुळे वर्षानुवर्षे चालणाऱ्या उद्योगांना एक जरी प्रॉडक्ट्स अतिरिक्त बनवायचे असेल तर (इसी) मागितली जाते. ही प्रक्रिया फारच वेळकाढू आहे. वर्षानुवर्षे यासाठी बैठक होत नाही. इन्व्हर्मेंट क्लीअरन्स मिळेपर्यंत उत्पादन बाजारातून आउटडेटेड होऊन जाते. यासाठी विहित कालावधीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे बंधन घालणे आवश्यक आहे. लोटे पशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये कम्युनिटी हिट अँड पॉवर सेंटर, लॉजिस्टिक पार्क, इंटरनॅशनल कार्गो डेपो, लॅबरोटरी, मल्टिपल ईऑपरेटर फॅसिलिटीसारख्या उद्योग सक्षम करणाऱ्या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत.यासाठी केंद्र सरकारच्या निधीमधून शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून द्यावे.

या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, सेक्रेटरी अॅड. राज आंब्रे, संचालक कुंदन मोरे, शिरीष चौधरी, किसन चव्हाण, विश्वास जोशी आदी उपस्थित होते.

अन्य मागण्या

केंद्र सरकारने कोकणातील उद्योगांसाठी मागील सहा महिन्यांची आणि पुढील सहा महिन्यांची लेट फी माफ करावी. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीलगतच्या विस्तारित औद्योगिक वसाहतीमध्ये नवे उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. त्यातून रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल, अशीही मागणी करण्यात आली.

loading image
go to top