अर्जुना नदीवर ब्रिटिशकालीन पूल धोकादायक : शेकडो वाहने आणि चाकरमानी राजपूरला अडकले

तुषार सावंत
Wednesday, 5 August 2020

कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

कणकवली (सिंधुदुर्ग) :  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर शहरातील अर्जुना नदीवरील पुल धोकादायक असल्याने मंगळवारी रात्री आठ वाजता पुलावरी वाहतूक आज सकाळपर्यंत बंद करण्यात आली होती. यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली.  काहीनी 60 कि. मीचा फेराही घातला. 

कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक नदी-नाल्यांची पूरसदृश्य  स्थिती आहे. .मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर अर्जुना नदीवर ब्रिटिशकालीन पूल धोकादायक झालेला आहे. स्ट्रक्चरल ऑडिट नंतर या पुलाचा धोका प्रशासनाला कळविण्यात आलेला आहे. मंगळवारी पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. परिणामी अर्जुना नदी वरील ब्रिटिशकालीन पुलापर्यंत महापुराचे पाणी आले होते. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून या पुलावरची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.

हेही वाचा- दोडामार्ग तालुक्‍यातील  `हे` पूल पाण्याखाली -

मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना महामार्गावरच थांबण्यात  आले होते. पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता. त्यामुळे संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र काही वाहनने मुंबईकडून गोव्याच्या दिशेने येताना राजापूर साकरी - नाटे यामार्गे हातिवले गावातून पुन्हा महामार्गाकडे येऊन गोव्याच्या दिशेने मार्गस्थ होती. वाहनचालकांना तब्बल 60 किलोमीटरचा फेरा आणि दीड तासाचे अंतर वळसा घालून पुढील प्रवास करण्याची वेळ आली होती.

हेही वाचा- लाटांच्या तडाख्याने या किनारपट्टीची धूप -

अर्जुना नदीवरील पूल धोकादायक
मुंबई-गोवा महामार्गाच्या ब्रिटिशकालीन बांधकामाच्या वेळी उभारलेला हा पूल वाहतुकीस धोकादायक झालेला आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मध्ये नव्याने ब्रिज प्रस्तावित आहे. मात्र हे काम गेले दोन वर्षे रखडलेली आहे. त्यामुळे धोकादायक पुलावरून पावसाळ्यातच वाहतूक करणे थांबविण्यात येत आहे.

 सावित्रीची घटना टाळण्यासाठी ....
महामार्गावरील महाड जवळच्या सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल पोचवून मोठा हाहाकार माजला होता. मुसळधार पावसामध्ये 2014 च्या सुमारास सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने अनेक वाहने नदीच्या प्रवाहात वाहून गेली होती. त्यानंतर मुंबई-गोवा महामार्ग त्या चौपदरीकरणाला ही सुरुवात झाली. पण  राजापूरचा हा धोकादायक पूल अजूनही वाहतुकीसाठी सुरू आहे. सावित्री नदीवरील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

हेही वाचा-दिलासादायक ! सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनशेच्यावर कोरोनामुक्त -
चाकरमान्यांचा ओघ वाढला 

गणेश उत्सव साजरा करण्याचा कालावधी जसा कमी होऊ लागला आहे तर त्याचे मुंबईहून  कोकणकडे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढू लागली आहे बहुतांशी चाकरमानी हे मुंबई-गोवा महामार्गाने सिंधुदुर्ग किंवा गोव्याकडे येताना दिसत आहेत मुसळधार पाऊस असतानाही ही मोठ्या संख्येने माने महामार्गावरून जाऊ लागली आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: British Era bridge over the Arjuna River at a distance of 1.5 km from Rajapur