दिलासादायक ! आरगावातील भावा-बहिणीची कोरोनावर मात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

तालुक्‍यातील आरगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या दोन लहान मुलांपैकी नऊ वर्षीय मुलगी उपचाराअंती निगेटिव्ह झाल्यानंतर तिचा आठ वर्षांच्या भावाच्या शेवटच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

लांजा ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील आरगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या दोन लहान मुलांपैकी नऊ वर्षीय मुलगी उपचाराअंती निगेटिव्ह झाल्यानंतर तिचा आठ वर्षांच्या भावाच्या शेवटच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे लांजा तालुक्‍यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोनने कमी झाली आहे. लांजा तालुक्‍याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब ठरली आहे. 

तालुक्‍यातील आरगाव येथील मुंबई भांडूप येथून एक पाच जणांचे कुटुंब 8 मे रोजी गावाला आले होते. शनिवारी 9 मे रोजी त्यांचे स्वॅब नमुने घेतले होते. 10 मे रोजी त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाले. दोन सख्खी भावंडे गेले पंधरा दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. त्यांच्यावरील कोरोनाचे उपचार यशस्वी होऊन सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. या दोन भावंडातील प्रथम बहिणीला शनिवारी (ता.23) रात्री घरी सोडण्यात आले होते.

यावेळी गावातील ग्रामस्थांनी तिचे स्वागत केले होते. त्यानंतर तिच्या सोबत कोरोनाबाधित असलेला तिचा आठ वर्षांच्या भावाचाही शेवटचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. या आठ वर्षांच्या मुलाला जिल्हा शासकीय रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी उपस्थित डॉक्‍टर्स व नर्सेसनी त्याला टाळ्या वाजवून व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brothers And Sisters From Argaon Defeated Corona