राजापुरात बीएसएनएलची सेवा कोलमडली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

राजापूर - गेल्या सुमारे सहा दिवसांपासून तालुक्‍यातील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडालेला आहे. बीएसएनएलची लॅण्डलाईन आणि मोबाईल सेवा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाली असून दूरध्वनी संच सध्या शोभेचे बाहुले बनले आहेत. यासंबंधित बीएसएनएल विभागाशी संपर्क होत नव्हता. मात्र, वीज महावितरण विभागाने वीजबिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडीत केल्याचे समजते.

या साऱ्यामध्ये बीएसएनएलचे ग्राहक मात्र, चांगलेच हैराण झाले आहेत.तालुक्‍यामध्ये बीएसएनएलचे जाळे विणलेले असून गावोगावी मोठ्या संख्येने बीएसएनएल सेवेचे ग्राहक आहेत. मात्र, गेल्या सहा दिवसांपासू शहरासह तालुक्‍यातील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. बीएसएनएलची लॅण्डलाईन आणि मोबाईल सेवा खंडीत झाली आहे.

बीएसएनएलने वीजबिल न भरल्याने महावितरण विभागाने त्यांचा वीजपुरवठा खंडीत केल्याचे समजते. हा बिलभरणा करण्यासाठी बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याचीही चर्चा आहे. यावर तातडीने उपाययोजना करून विस्कळीत झालेली बीएसएनएलची सेवा पुन्हा तातडीने कार्यान्वित करावी अशी मागणी आहे. 

फटका शासकीय कार्यालये, बॅंकाना

बीएसएनएलच्या लॅन्डलाईन व ब्रॉडबॅन्ड सेवेवर अनेक शासकीय कार्यालये अवलंबून आहेत. मात्र, ही सेवाच विस्कळीत झालेली असल्याने त्याचा फटका शासकीय कार्यालये, बॅंका, ऑनलाईन प्रक्रिया तसेच खासगी आस्थापना यांना बसला आहे. तहसीलदार कार्यालयामध्ये आपत्कालीन सेवा केंद्र सुरू करण्यात आले. त्यासाठी कार्यालयातील बीएसएनएलचा लॅण्डलाईन क्रमांक सर्वांना संपर्कासाठी देण्यात आला.मात्र, गेले पाच ते सहा दिवसांपासून तेथील लॅन्डलाईन सेवा खंडीत झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL service collapses at Rajapur