Sindhudurg Accident: दुर्दैवी घटना! 'म्हशीला चुकविताना मोटार उलटून तरुण ठार'; माड्याचीवाडीतील घटना, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Madyachiwadi Accident: मोटार करमळगाळू बसथांब्याजवळ आली असता समोर अचानक म्हैस आडवी आली. तिला चुकविण्याच्या नादात चालक परुळेकर यांनी मोटार गटाराच्या दिशेने नेली. यावेळी त्यांचा गाडीवरील ताबा सुटून ती मुख्य रस्ता सोडून गटारात उलटली.
Overturned car in Madyachiwadi after driver swerved to avoid buffalo; youth killed, driver injured.Sakal
म्हापण / कुडाळ : रस्त्यात म्हैस आडवी आल्याने तिला चुकविण्याच्या नादात मोटार उलटून तरुण ठार झाला, तर चालक जखमी झाला. रोहन ऊर्फ अक्षय सावंत (वय १८, रा. परुळे कुशेवाडा, वडाणवाडी) असे मृताचे नाव आहे.