esakal | धक्कादायक : म्हशीच्या पोटात चक्क ४५ किलोचा कचरा
sakal

बोलून बातमी शोधा

buffalo stomach 45 kg wastage in konkan but lost her baby in this operation in ratnagiri

शस्त्रक्रीयेद्वारे म्हशीच्या पोटातील मृत रेडकू बाहेर काढून म्हशीला जीवदान दिले.

धक्कादायक : म्हशीच्या पोटात चक्क ४५ किलोचा कचरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवगड : तालुक्‍यातील मुटाट पाळेकरवाडी येथील एका म्हशीवर शस्त्रक्रीया करून तिच्या पोटातील सुमारे ४५ किलो प्लास्टिक पिशव्या, कपडे तसेच अन्य साहित्य बाहेर काढले. तसेच अन्य एका शस्त्रक्रीयेद्वारे म्हशीच्या पोटातील मृत रेडकू बाहेर काढून म्हशीला जीवदान दिले. पशुधन विकास अधिकारी डॉ. माधव घोगरे यांनी या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.

हेही वाचा - कोकणात आता या शाळांचे गेट होईल कायमचे बंद..! 

याबाबतची माहिती अशी, मुटाट पाळेकरवाडी येथील शंकर बाळू पाळेकर या शेतकऱ्याच्या एका गाभण म्हशीचा प्रसुती कालावधी पूर्ण झाला होता; मात्र प्रसुती होत नसल्याने त्यांनी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. घोगरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी म्हशीची तपासणी केली. गाभण म्हशीचे रेडकू पोटामध्येच दगावल्याची तपासणीत समोर आले. तसेच प्लास्टिक पिशव्या, कपडे आदी अखाद्या साहित्य गिळल्यामुळे प्रसुतीला अडथळा होत असल्याचे सांगितले. डॉ. घोगरे यांनी पाच तास शस्त्रक्रिया करून तब्बल ४५ किलो कचरा बाहेर काढला. दगावलेले रेडकूही बाहेर काढून म्हशीला जीवदान दिले. 

हेही वाचा -  महिलेला २५ लाख रुपयांची लॉटरी पडली महागत 

परिसरात विविध ठिकाणी असलेला कचरा, प्लास्टिक, टाकाऊ वस्तू  ही जनावरे खाऊन टाकतात. प्लास्टिकमध्ये बंद असलेले काही पदार्थ खाल्ल्याने प्लास्टिक त्यांच्या पोटात जाते. परिणामी त्यांना अशा घटनांमध्ये त्यांचा जीवही जाऊ शकतो. मोकाट असणारी जनावरे आणि त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या घटनांबाबत त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांचा हकनाक बळी जाणार नाही.

संपादन - स्नेहल कदम