
JCB and bulldozer seized by authorities in Sasoli following large-scale illegal tree-cutting.
Sakal
दोडामार्ग: सासोली येथे हजारो झाडांची बेसुमार कत्तल करणाऱ्या कंपनीवर वनविभागाने कारवाई करत दोन जड मशिनरी (बुलडोझर आणि जेसीबी) जप्त केल्या. झाडांची मोठ्या प्रमाणावर झालेली कत्तल आणि त्यात वापरलेली ही मशिनरी पाहून वनविभागाने तत्काळ कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली. या कारवाईनंतर कंपनीला मोठा दणका बसल्याची चर्चा आहे. प्रभारी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी घटनेला दुजोरा दिला.