अन्यथा आमच्या पद्धतीने हा विषय हाती घेऊ ; नीलेश राणेंचा इशारा

bund work cheking by BJP Ex MLA nilesh rane in sindhudurg
bund work cheking by BJP Ex MLA nilesh rane in sindhudurg

मसुरे : मसूरकर जुवा बेटावरील धूपप्रतिबंधक बंधारा येथील मानवी वस्तीकडे तत्काळ झालाच पाहिजे, येत्या दोन दिवसांत बंधाऱ्यासाठी मटेरियल टाका, अन्यथा आमच्या पद्धतीने हा विषय हाती घेऊ, गाठ माझ्याशी आहे, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी त्यांनी कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

मसुरे येथील मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्याचा प्रश्‍न मागील दोन महिन्यांपासून गाजत आहे. याठिकाणी मानवी वस्तीच्या संरक्षणासाठी दीड कोटी रुपये खर्चून धूपप्रतिबंधक बंधारा मंजूर झाला. मात्र, बेटाच्या पूर्व आणि पश्‍चिमेला दोन टोकावर बंधारा बांधून मानवी वस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी काल सकाळी भेट देऊन पाहणी केली. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हपसेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, बाबा परब, सभापती अजिंक्‍य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, सरोज परब, महिला अध्यक्ष लक्ष्मी पेडणेकर, युवक अध्यक्ष विक्रांत नाईक, युवक उपाध्यक्ष आशिष हडकर, विश्वास मसुरकर, यासीन सय्यद, विलास मेस्त्री, तात्या हिंदळेकर, रामदास मसुरकर, सारिका मुणगेकर, देवानंद कांबळी, संजय मसुरकर, शिवाजी परब, सतीश मसुरकर, ओमकार मुणगेकर, पांडू गोलतकर, गणेश राणे, प्रकाश चव्हाण, अनिकेत चव्हाण, एकनाथ मसुरकर अशोक मसुरकर, शुभम मसुरकर आदी उपस्थित होते. 

या बेटाची पाहणी केल्यानंतर बेटावरील मानवी वस्ती एका ठिकाणी आणि बंधारा दुसऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती दिसून आली. त्यामुळे निलेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "दीड कोटी खर्चून मानवी वस्तीकडे बंधारा बांधला नाही, मग या बंधाऱ्याचा उपयोग काय? सरकारने या लोकांना वाऱ्यावर सोडलं असलं तरी आम्ही यांच्या पाठीशी उभे असून बंधाऱ्याबाबत योग्य कार्यवाही झाली नाही तर आम्ही आमची 
भूमिका घेऊ." यानंतर पतन विभागाचे कनिष्ठ अभियंता याठिकाणी आल्यानंतर नीलेश राणे यांनी त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. 

राणे म्हणाले, "तुमच्या चुकीमुळे हा बंधारा चुकीच्या ठिकाणी बांधला गेला आहे. त्यामुळे हा त्रास आम्ही सहन का करायचा? येथील मानवी वस्तीकडे बंधारा झालाच पाहिजे, दोन दिवसात त्याचे मटेरियल पडले पाहिजे, सरकारकडे आता पैसे नाहीत. त्यामुळे नवीन अंदाजपत्रक बनवून बंधारा बांधण्यासाठी वेळ लोटणार आहे. या कालावधीत बंधाऱ्या अभावी इकडची लोकं पुराच्या पाण्यात वाहूून गेली तर जबाबदार कोण? ठेकेदाराकडून तात्काळ वस्तीच्या ठिकाणी बंधारा घालून घ्या. त्याच्या बिलासाठी आम्ही देखील प्रयत्न करू; मात्र कोणत्याही परिस्थितीत तात्काळ बंधारा झाला पाहिजे. नाहीतर गाठ माझ्याशी आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com