esakal | तीन दिवसांत फिरले पंधरा लाखांवर पाणी ; सागरी जलक्रीडा व्यावसायिकांवर बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

the business man sea level in konkan government close to this because of corona but within 3 days 15 lakh rupees loss in ratnagiri

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कोकणातील सर्वच किनाऱ्यांवरील नौका बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

तीन दिवसांत फिरले पंधरा लाखांवर पाणी ; सागरी जलक्रीडा व्यावसायिकांवर बंदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मंदिरे उघडल्यानंतर फिरण्यासाठी पर्यटकांनी कोकणातील किनारे गाठले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली; परंतु सागरी जलक्रीडा व्यावसायिकांवर बंदी घालण्यात आल्यामुळे गेल्या तीन दिवसांत सुमारे पंधरा लाखांहून अधिकच्या उलाढालीवर पाणी फेरले आहे. यामुळे शेकडो लोकांचा रोजगार बुडाला आहे.

हेही वाचा -  तरुणांनो सावधान : काही  मिनिटातच खात्यावरून पैसे होतायत गायब -

कोरोनामुळे गर्दी टाळा, असे आवाहन शासनाकडून केले जात आहे; मात्र टाळेबंदीमुळे घरात राहिलेले नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडले आहे. सरत्या दिवाळीत मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतल्यामुळे धार्मिक पर्यटनाकडे लोकांचा कल वाढला आहे. गेल्या पाच दिवसात गणपतीपुळे मंदिरात सुमारे वीस हजार पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. किनारे फुलले असून वॉटर स्पोर्टस्‌ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

नौका, स्कुटरद्वारे पाण्यात सैर करण्यासाठी पर्यटकांची गर्दी आहे. समुद्र सफरीमध्ये एका बोटीत आठ लोकांना बसविले जाते. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कोकणातील सर्वच किनाऱ्यांवरील नौका बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (१८) त्याची अंमलबजावणी करण्यात आली. अलिबाग, मुरूड, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, हर्णे, मंडणगड, गुहागर, मालगुंड, गणपतीपुळे, आरे-वारे, नेवरे, रत्नागिरी तर सिंधुदुर्गातील मालवण, तारकर्ली, देवबाग, मिठबाव, शिरोडा या ठिकाणी जलक्रीडा सफरी होतात.

हेही वाचा - सीट बेल्ट न लावण्याची बनतेय फॅशन पण

गणपतीपुळेमध्ये मोसमात दिवसाला दोन ते तीन लाख रुपयांची उलाढाल होते. या बोटींवर सुमारे १०० ते १२५ कर्मचारी काम करतात. त्यांचा रोजगारही त्यावरच अवलंबून आहे. मंदिरे सुरू झाल्यापासून एकट्या गणपतीपुळे येथे सुमारे २० हजार तर जिल्ह्यात मिळून लाखभर पर्यटक येऊन गेले आहेत. जलक्रीडांवर बंदी आल्यामुळे गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात सुमारे पंधरा लाखाहून अधिकचा फटका या व्यावसायिकांना बसला आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी व्यवसायिकांकडून केली जात आहे.

"ऐन हंगामात जलक्रीडा व्यवसाय बंद करण्यात आला आहे. कोरोनामुळे मार्चपासून व्यवसाय बंद होता. आता बंद ठेवले तर ते परवडणार नाही."

- उदय पाटील, अध्यक्ष, मोरया वॉटर स्पोर्टस्‌

संपादन - स्नेहल कदम