esakal | यंदा भात खरेदीचा उच्चांक ः नाईक
sakal

बोलून बातमी शोधा

Buy rice statement mla vaibhav naik konkan sindhudurg

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7 कोटी 68 लाख 47 हजार रूपये च्या भाताची खरेदीची नोंद झाली आहे त्यातील 4 कोटी 78 लाख 63 हजार रूपये शासनाकडून जमा झाले आहेत. याव्यतिरिक्त बोनसची रक्कम मिळणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. 

यंदा भात खरेदीचा उच्चांक ः नाईक

sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - प्रत्येक तालुक्‍यातील शेतकरी संघ आणि सोसायट्या यांच्या माध्यमातून यंदा उच्चांकी भात खरेदी झाली आहे. प्रतिक्विंटलमागे 1868 रुपयांचा हमीभाव आणि 700 रुपयांचा बोनस यामुळे शेतकऱ्यांना 2568 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7 कोटी 68 लाख 47 हजार रूपये च्या भाताची खरेदीची नोंद झाली आहे त्यातील 4 कोटी 78 लाख 63 हजार रूपये शासनाकडून जमा झाले आहेत. याव्यतिरिक्त बोनसची रक्कम मिळणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. 

जिल्ह्यात यंदा भात खरेदीसाठी शेतकरी संघ आणि सोसायट्या अशा एकूण 35 ठिकाणी केंद्रे निश्‍चित करण्यात आली. या सर्व ठिकाणी 20 फेब्रुवारी पर्यंत 3 हजार 995 शेतकऱ्यांकडून एकूण 44 हजार 481 क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना क्विंटलमागे बोनस स्वरूपात 700 रुपये देण्याचे जाहीर केले असून ही रक्‍कमही लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. 
सिंधुदुर्गात गतवर्षी 36 हजार 882 क्विंटल भात खरेदी करण्यात आली होती. तर आत्तापर्यंत 44 हजार 481 क्विंटलची वाढीव भात खरेदी झाली असून अजूनही भात खरेदी सुरू आहे. 

नाईक म्हणाले, ""सिंधुदुर्गात भात हे प्रमुख पीक असून यांत्रिकीकरणाद्वारे भात लावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. तसेच आमदार दीपक केसरकर यांनी आणलेल्या चांदा ते बांदा योजनेतून, कृषी यांत्रिकिकरण अंतर्गत शेतकऱ्यांना शेती आवजारे सबसिडीतुन देण्यात आली. त्याद्वारे शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात भात लागवड करून उत्पादन घेतले. या भात उत्पादनाला शासनाकडून जास्तीत जास्त हमीभाव व बोनस मिळवून सातत्याने पाठपुरावा केला. यंदा लवकर भात खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांचेही सहकार्य लाभले.'' 

बोनसही मिळणार 
यंदा कुडाळातील भात खरेदी केंद्रावर सर्वाधिक 6 हजार 881 क्विंटल भात खरेदी झाली. तर निवजे सारख्या ग्रामीण भागातील भात खरेदी केंद्रावर 1 हजार 95 क्विंटल भात खरेदी झाली. जिल्ह्यात एकूण 7 कोटी 68 लाख 47 हजार रुपयांची भात खरेदीची नोंद झाली आहे त्यातील 4 कोटी 78 लाख 63 हजार रूपये शासनाकडून जमा झाले आहेत. याव्यतिरिक्त बोनसची रक्कम मिळणार आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांमुळे कुडाळ येथे झालेल्या बजाज राइस मिलमार्फतही शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी केल्याचे नाईक म्हणाले.  

संपादन - राहुल पाटील