Gram Panchayats Election 2021: कोकणात ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा उडणार : आचारसंहिता लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election

कोकणात ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा उडणार : आचारसंहिता लागू

खेड : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीमधील रिक्त पदांची पोटनिवडणूक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत असून एक महिन्यानंतर ती संपणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या २६ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. हे आरक्षण ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी होऊ नये तसेच नागरिकांच्या मागास प्रर्वगाचे अंतर्गत आरक्षण २७ टक्के राहील, यासाठी काही ग्रामपंचायतीच्या आरक्षणात बदल करण्यात आला आहे.

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार असून ग्रामपंचायतनिहाय रिक्त असलेली पदे अशी :

बहिरवली प्रभाग तीन - सर्वसाधारण स्त्री १, चौगुले मोहल्ला प्रभाग १ - सर्वसाधारण स्त्री १ व प्रभाग ३- नामाप्र, रजवेल प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १ व प्रभाग ३- सर्वसाधारण स्त्री १, सवणस बुद्रुक प्रभाग १- अनुसूचित जाती स्त्री १ व प्रभाग २- सर्वसाधारण १ , सवणस प्रभाग १- सर्वसाधारण स्त्री १ , खोपी प्रभाग ३ - नामाप्र स्त्री १ , वावेतर्फ नातू प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १, कळंबणी खुर्द प्रभाग १- सर्वसाधारण स्त्री १ व प्रभाग २- अनुसूचित जमाती १ , हुंबरी प्रभाग २- अनुसूचित जमाती १, नांदीवली प्रभाग १- सर्वसाधारण स्त्री १ , आंजनी प्रभाग २- सर्वसाधारण १, तळवटपाल प्रभाग १- सर्वसाधारण स्त्री २ , प्रभाग - २ अनुसूचित जाती १ व अनुसूचित जाती स्त्री १, वावेतर्फ खेड प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १ , धामणंद

प्रभाग १ - अनुसूचित जमाती १, प्रभाग ३- अनुसूचित जाती १, साखर प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १, सापिर्ली प्रभाग ३- सर्वसाधारण स्त्री १, सोनगाव प्रभाग ३- नामाप्र १, मुरडे प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १, कर्जी प्रभाग १- सर्वसाधारण १, प्रभाग -२ नामाप्र १ व प्रभाग ३- नामाप्र स्त्री १, तुंबाडप्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १, पन्हाळजे प्रभाग १- सर्वसाधारण स्त्री २, प्रभाग २- नामाप्र १ व सर्वसाधारण १, मेटे प्रभाग ३- सर्वसाधारण स्त्री १, कावळे प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १, कर्टेल प्रभाग १- सर्वसाधारण १ व प्रभाग ३- नामाप्र स्त्री १, चिंचघर प्रभाग ४- सर्वसाधारण १ व घाणेखुंट ग्रामपंचायतीच्या प्रभाग ४, सर्वसाधारण स्त्री १ आदींचा समावेश आहे.

हेही वाचा: गद्दारी सहन करणार नाही,पाडापाडीला थारा नाही : नारायण राणे

२१ डिसेंबरला मतदान, २२ ला मतमोजणी

पोटनिवडणुकीची अधिसूचना सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या मुदतीत नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत आहे. ९ डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. २२ डिसेंबरला मतमोजणी होईल.

जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक

रत्नागिरी जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतीच्या २७५ पदांसाठी पोटनिवडणुकीत मतदान होणार आहे. या निवडणुका कोविड-१९ च्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करून ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

loading image
go to top