Devgad : देवगडात २१ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election

देवगडात २१ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका जाहीर

देवगड : येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीबरोबरच तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या एकूण ३२ जागांसाठी पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी मंगळवार (ता. ३०) ते ६ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करावयाची आहेत. २१ डिसेंबरला मतदान असून संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे.

जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्र सादर करावयाची आहेत. ७ डिसेंबरला सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी होईल. ९ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करावयाची आहे.

आवश्यक भासल्यास २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होईल. २२ डिसेंबरला सकाळी मतमोजणी करण्यास प्रारंभ होईल. तालुक्यातील आरे ग्रामपंचायतीच्या ४ जागा, महाळुंगे ३ जागा, हडपीड, पडेल, कट्टा, पाटगांव, पोंभुर्ले आणि वरेरी येथे प्रत्येकी दोन जागा तर कुवळे, मणचे, ठाकूरवाडी, वाघिवरे -वेळगिवे, चाफेड, विठ्ठलादेवी, चांदोशी, हिंदळे, पाळेकरवाडी, गिर्ये, वाघोटण, खुडी, टेंबवली आदी ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोट निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे.

loading image
go to top