esakal | महावितरणचा झटका ; वीज बील भरा अन्यथा...
sakal

बोलून बातमी शोधा

 Campaign to recover electricity bills

घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि इतर असे मिळून 43 हजार 782 ग्राहकांना झटका दिला असून त्यांची वीज जोडणी तोडल्या आहेत. यावर्षी महावितरणला 74 कोटी 34 लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 62 कोटी 90 लाख वसूली झाली आहे. 15 कोटी 4 लाखांची थकबाकी आहे.

महावितरणचा झटका ; वीज बील भरा अन्यथा...

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी - महावितरणला कंपनीने आर्थिक वर्षाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वसुलीचा धडाका लावला आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबवून थकबाकीदार ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि इतर असे मिळून 43 हजार 782 ग्राहकांना झटका दिला असून त्यांची वीज जोडणी तोडल्या आहेत. यावर्षी महावितरणला 74 कोटी 34 लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 62 कोटी 90 लाख वसूली झाली आहे. 15 कोटी 4 लाखांची थकबाकी आहे.
 

हे पण वाचा - तीन वर्षाच्या आत्याचाराने ती राहिली गरोदर आणि...

जिल्ह्याची थकबाकी कोटीवरून लाखात आणण्याचा महावितरण कंपनीचा मानस आहे. त्याअनुषंगाने जोरदार वीज बिल थकबाकी वसुलीवर भर देण्यात आला आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये तसे आदेश देण्यात आले आहेत. वसुलीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांना दररोज अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. थकबाकीची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढल्याने महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. या आर्थिक वर्षात 74 कोटी 34 लाखांचे उद्दिष्ट महावितरणपुढे आहे. पैकी 62 कोटी 90 लाखची वसूली करण्यात महावितरणला यश आले आहे. म्हणजे 84 टक्के वसूली झाली आहे. तर 15 कोटी 4 लाखांची वसुली शिल्लक राहिली आहे. 

हे पण वाचा - काय चालत मशिद-मदरशात....
 

थकबाकीदारांमध्ये 32 हजार घरगुती ग्राहकांची थकबाकी 3 कोटी 73 लाख आहे. 6 हजार 900 व्यापारी वर्गातील ग्राहकांची थकबाकी 3 कोटी 22 लाख आहे. 1 हजार 100 औद्यागिक ग्राहकांची वीज बिलापोटी 1 कोटी 69 लाख थकबाकी आहे. शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या विविध योजनांचीही महावितरणकडे थकबाकी आहे.  त्यामध्ये शेती पंप, पाणी योजना, स्ट्रीट लाईट अशा इतर 3 हजार 782 ग्राहकांचे सुमारे 6 कोटी 69 लाख रुपये थकीत आहेत. ग्राहकांना वारंवार थकबाकीसंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या. तरी ग्राहकांनी त्याला दाद न दिल्याने महावितरण कंपनीने कठोर पावले उचलून थकबाकीदारांच्या जोडण्या तोडण्याची आणि वसुलीची मोहीम हाती घेतली आहे.

महावितण कंपनीला कोट्यवधीची थकबाकी लाखात आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यात सर्वत्रच वसुली मोहीम सुरू आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे आणि थकबाकी भरून आपल्यावरील कारवाई टाळावी.

देवेंद्र सायनेकर, अधिक्षक अभियंता महावितरण