esakal | २३ लाख रूपयांची रोकड लुटीचा बनाव असल्याचे उघड | Crime
sakal

बोलून बातमी शोधा

crime

२३ लाख रूपयांची रोकड लुटीचा बनाव असल्याचे उघड

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी - एटीएममध्ये भरण्यासाठी नेत असलेली २३ लाख रूपयांची रोकड अज्ञात तिघांनी लुटल्याच्या 'त्या' दाव्याचा पोलीसांनी आज सायंकाळी पर्दापाश केला. कंपनीच्या 'त्या' दोघाही कर्मचाऱ्यांनी हा बनाव रचल्याचे पोलीसात कबुल केले. हा पुर्वनियोजीत प्लॅन असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. मुद्देमाल ताब्यात घेण्यासाठी पोलीस कुडाळकडे रवाना झाले आहेत. या बनावात आणखी काही सहभागी असण्याची शक्यता आहे.

सेक्युलर व्हल्यु इंडिया कंपनीचे विठ्ठल खरात आणि सगुण केरवडेकर या दोन कर्मचाऱ्यांनी एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी कणकवली येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून ३० लाख रूपये घेतले. त्यातील ७ लाख रूपये त्यांनी तेथील शाखेत भरले तर उर्वरित रक्कम घेवून ते वैभववाडीला येत होते. दरम्यान काल (ता.12) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोकिसरे-बांधवाडी येथे पाठीमागून आलेल्या तिघांनी कर्मचाऱ्यांच्या दुचाकीवर लाथ मारून गाडी खाली पाडली. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्यांच्याकडील २३ लाख रूपये घेवून ते अज्ञात चोरटे पसार झाले असल्याची फिर्याद कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काल (ता.१२) पोलीसांत दिली. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे सर्वत्र खळबळ माजली. संपूर्ण राज्यातील पोलीस खाते या प्रकारामुळे अलर्ट झाले होते; परंतु काल हा प्रकार घडल्यानंतर वैभववाडी पोलीस, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी, पोलीस विभागीय अधिकारी एवढेच नव्हे तर रात्री उशिरा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे वैभववाडी आले होते. कर्मचाऱ्यांकडून घडलेली हकीगत ऐकल्यानंतर पोलीसांना हा बनाव असल्याची खात्री झाली होती; परंतु पोलीस त्या दोन्हीही कर्मचाऱ्यांकडुन अत्यावश्यक माहीती उलटसुलट पध्दतीने जाणुन घेत होते.

हेही वाचा: मिऱ्या-नागपूर महामार्गावरील तेरा गावांना ४४२ कोटींच्या निधीची प्रतीक्षा

काल रात्रीपासून २५ ते ३० पोलीस तपासाच्या कामात गुंतले होते. आज सकाळी त्यातील एका कर्मचाऱ्यांला घेवून पोलीसांनी त्याचे गाव गाठले. तेथे जावून गुन्हा उघडकीस येण्याच्या दृष्टीने काही सुगावा लागतो का? यासाठी प्रयत्न केले; परंतु त्यानंतर देखील पोलीसांना हवी असलेली माहीती मिळाली नाही.

आज सायंकाळी पोलीस स्थानकात आल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांनी पुन्हा त्या दोघांकडे चौकशीला सुरूवात केली. पोलीसांचा प्रसाद मिळताच ते दोघेही कर्मचारी पोपटासारखे बोलु लागले. त्यांनी त्या लुटीचा आपण बनाव केल्याचे पोलीसांना सांगीतले. पोलीसांनी त्या दोघांकडून मुद्देमाल कुठे ठेवला आहे? याची माहीती घेतली. ती रक्कम त्या दोघांनी कुडाळमधील एका मित्राकडे ठेवल्याचे पोलीसांनी सांगितल्यानंतर पोलीस त्या दोघांना घेवून कुडाळकडे रवाना झाले आहेत.

का केला बनाव?

बनाव काम करणाऱ्या कंपनीच्या या दोन-तीन कर्मचाऱ्यांकडुन एटीएममध्ये भरण्यासाठी दिले गेलेल्या रक्कमेपैकी ७ लाख रूपये खर्च झाले आहेत. त्यामुळे हा बनाव करण्यात आला. त्यामुळे काल बनाव करून २३ लाख नव्हे तर १६ लाख रूपये गडप करण्याचा त्या तिघांचा डाव होता.

पुर्वनियोजीत प्लॅन

२३ लाखाच्या लुटीच्या प्लॅन हा दोन तीन दिवसांपूर्वीच निश्तिच करण्यात आला होता. हे दोघे तळेरेहुन एका विशिष्ट वेळेत निघणार होते. त्याचवेळी पैसे परत घेवुन जाण्यासाठी मित्राला तेथे वेळेत पोहोचण्यास सांगण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीत एकमेकाला फोन करायचा नाही, असे देखील ठरले होते.

loading image
go to top