काजू बी खरेदीला प्रारंभ़; जानवली सोसायटीने दिला `इतका` दर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काजूबी विक्रीसाठी आणले होते. या काजू बी विक्रीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. लॉकडाऊनमुळे यंदा उत्पादकांना काजू बी विक्रीमध्ये मोठी अडचण निर्माण झाली होती.

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - जानवली येथील गाव विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून काजू बी खरेदीला सुरुवात झाली आहे. जिल्हा बॅंकेचे चेअरमन सतीश सावंत यांच्या हस्ते आज या उपक्रमाला सुरुवात झाली. जानवली सेवा सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

शिवसेनेचे नेते संदेश पारकर, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन दामू सावंत, एस टी कामगार संघटनेचे नेते विनय राणे, पोलिस पाटील मोहन सावंत, ग्रामपचायत सदस्या शुभदा रावराणे, राजश्री राणे, दिव्या पेडणेकर, गजानन रेडकर, प्रसाद राणे, विकास सेवा सोसाटी संचालक प्रशांत राणे, ऍड. हर्षद गावडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सत्यवान राणे, संतोष कारेकर, अनिल साटम, पांडुरंग राणे, माजी सरपच अशोक राणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काजूबी विक्रीसाठी आणले होते. या काजू बी विक्रीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. लॉकडाऊनमुळे यंदा उत्पादकांना काजू बी विक्रीमध्ये मोठी अडचण निर्माण झाली होती. खासगी स्तरावरील व्यापाऱ्यांनी 70 ते 80 रुपये किलो दराने काजू खरेदी केली होती. त्यामुळे काजू विक्री करून उदरनिवार्ह करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने सेवा सोसायटीना कॅश क्रेडिट स्वरूपात रोख रक्कम उपलब्ध करून दिल्यानंतर बहुतांशी सेवा सोसायटीच्या माध्यमातून गावातील काजू खरेदीस सुरुवात झाली आहे.

सध्या सोसायटीच्या माध्यमातून 100 ते 105 रुपये असा किलोला काजू बी ला दर दिला जात आहे. मात्र बाजारात हा दर 70 ते 80 रुपये इतका आहे. त्यामुळे किलोमागे शेतकऱ्यांना सरासरी 30 ते 35 रुपये नुकसान होत होते. यावर जानवली सेवा सोसायटीने या उपक्रमाला सुरुवात करून गावातील शेतकऱ्यांच्या काजू बीची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cashew Nut Buying Starts In Janwali Society Sindhudurg Marathi News