बागेत काजू काढताना लागलेल्या आगीत काजू मालकाचा होरपळून मृत्यू

ओटवणे-कारिवडे सीमेवरील बागेत काजू काढताना आगीत काजू मालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
Madhukar Chiplunkar
Madhukar ChiplunkarSakal

सावंतवाडी - ओटवणे-कारिवडे सीमेवरील बागेत (Garden) काजू (Cashew) काढताना आगीत (Fire) काजू मालकाचा होरपळून मृत्यू (Death) झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. मधुकर श्रीधर चिपळूणकर ( वय ७२, रा. ओटवणे भटवाडी) असे त्यांचे नाव आहे. दुपारी उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कामगाराने बागेत जाऊन पाहिले असता जळालेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर याबाबत ओटवणे पोलीस पाटील लक्ष्मण गावकर यांनी सावंतवाडी पोलिसांत खबर दिली.

ओटवणे-भटवाडी येथील निवृत्त शिक्षक मधुकर चिपळूणकर हे आज दुपारी ११.३० च्या सुमारास बागेत आगीस काढण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघाले. दुपारी उशीरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांचे नातेवाईक अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यासाठी बागेत गेले. त्यांनी बागेत शोधाशोध केली असता ते एका बांबूच्या बेटाखाली मृतावस्थेत आढळून आले. यावेळी त्यांच्या अंगावरील सर्व कपडे जळून खाक झाले होते तसेच अंग होरपळून गेले होते. स्थानिक ग्रामस्थांना याबाबतची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर ओटवणे पोलीस पाटील लक्ष्मण गावकर यांनी याबाबतची खबर सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली.

Madhukar Chiplunkar
खासदार सुनील तटकरे यांनी स्वतःचे कुटुंब सोडून दुसरा कुणाचाच विकास केलेला नाही

सायंकाळी उशिरा पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल दर्शन सावंत, बीट अंमलदार मनोज राऊत यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवला. रात्री उशिरा विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत मधुकर चिपळूणकर यांचा मृत्यू आग विझवताना होरपळून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मधुकर चिपळूणकर यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे, तीन भाऊ, भावजया, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ओटवणे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com