थर्टी फर्स्टला नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 501 जणांना पोलिसांचा दणका

celebration of k31 december restriction avoid people 501 under the police fining in ratnagiri
celebration of k31 december restriction avoid people 501 under the police fining in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला अनेकांनी जंगी तयारी केली होती. कोरोनामुळे शासनाने यावर बंधने आणली. काही नियम लागू केले होते. परंतु या उत्साहाच्या भरात जिल्ह्यातील 501 जणांवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

कोरोनामुळे मद्यपान करण्याची ब्रेथ एनालायझर चाचणी करण्यास बंदी असल्याने तळीराम कारवाईतून सुटले. 
कोरोना विषाणूचे बदलते स्वरूप अतिशय धोकादायक आहे. त्याचा संसर्ग आणि फैलाव झटपट होत असल्याने शासनाने 31 डिसेंबर साजरा करण्यावर काही निर्बंध घातले होते. सरत्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाचे स्वागत करताना शासनाने लागू केलेल्या नियामंचे काटेकोर पालन व्हावे, म्हणून जिल्हाभर पोलिस तैनात केले होते.

जिल्ह्यातील पोलिसांनी 31 डिसेंबरला दिवसभरात 220 केसेस केल्या. त्यामध्ये वाहतूक शाखेने 62 केसेस केल्या. यामध्ये ट्रिपल सीट, लायसन्स नसणे, हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न लावणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे आदी नियामंचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दुकाने किंवा चायनीज गाड्या सुरू ठेवण्याची वेळ रात्री 11 वाजेपर्यंतच होती. त्याचा मोठा परिणाम होऊन सार्वजनिक मोठे कार्यक्रम त्यामुळे रद्द झाले.

छोट्या-छोट्या आणि घरगुती सेलिब्रेशनला बहुतेकांनी पसंती दिली. पोलिसांनी रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत पुन्हा कारवाईची मोहिम राबविली. यामध्ये जिल्ह्यात 281 केसेस करण्यात आल्या. यातील 94 केसेस वाहतूक शाखेच्या आहेत. 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी एकूण 501 केसेस केल्या. त्यामध्ये वाहतूक शाखेच्या 156 केसेसचा समावेश आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com