esakal | कोकणात सागरी महामार्ग होणार आता राष्ट्रीय महामार्ग....
sakal

बोलून बातमी शोधा

The Central Government has in principle approved to give the national highway in kokan marathi news

 रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यास केंद्र शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे.

कोकणात सागरी महामार्ग होणार आता राष्ट्रीय महामार्ग....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यास केंद्र शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. तरी या दोन्ही जिल्ह्यातील सागरी महामार्गावरील पुलांची दुरूस्ती व रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामाला आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्या जेणेकरून पर्यटनास चालना मिळून जिल्ह्याचा विकास करता येईल, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोकण पर्यटन विकासासाठी हा सागरी महामार्ग मैलाचा दगड ठरणार आहे. या महामार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला हा समांतर मार्ग होणार आहे. अथांग पसरलेल्या समुद्र किनार्‍यावरून हा मार्ग होणार असल्याने पर्यटनवाढीला मोठा फायदा होणार आहे. मांडवा पोर्ट, रेवस, अलिबाग, मुरुड, दिघी पोर्ट, बाणकोट, दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, जैतापूर, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले असा हा 540 किमीचा महामार्ग प्रस्तावीत आहे.

हेही वाचा- राज्यात ठाकरे सरकार ; राणे समर्थकांची तानाशाही खपवून घेणार नाही -

सर्व्हेक्षणासीठी अत्याधुनिक ड्रोन कॅमेर्‍याचा वापर

किनारी भागामध्ये शासकीय जमीन कमी आहे. खासगी जमीनच जास्त प्रमाणात संपादित करावी लागणार आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून कमीत कमी 30 मीटर आणि जास्तीत जास्त 45 ते 60 मीटरचा दुपदरी किंवा चौपदरीचा पर्याय शासनाने ठेवला आहे. दुपदरीकरणाची अंदाजित रक्कम 1013.05 कोटी आहे तर चौपदरीकरणाची किंमत 21,239 कोटी एवढी आहे.महामार्गाच्या कामासाठी 3 एजन्सी निश्‍चित केल्या आहेत. सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. अत्याधुनिक ड्रोन कॅमेर्‍याचा वापर करून प्रथमच सागरी महामार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या मार्गावर 44 खाडी पूल, अतिमहत्वाचे 21 पूल आणि 22 मोठ्या मोर्‍या आहेत.

हेही वाचा-राज्यात ठाकरे सरकार ; राणे समर्थकांची तानाशाही खपवून घेणार नाही -

सागरी महामार्गासाठी निधीची मागणी

रस्त्याची फेरआखणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये तीव्र वळण, उतार काढून जास्तीत जास्त तो सरळ करण्यात येणार आहे. हे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आले आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्गाला काही हजार कोटीत पैसा खर्च झाल्यामुळे सागरी महामार्गाचे काम निधीअभावी मागे पडले आहे. सागरी महामार्गाचे काम झाल्यास कोकणात पर्यटनाला प्रचंड संधी उपलब्ध होणार आहे. म्हणून उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या मार्गाला निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मागणी लावून धरली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यास केंद्र शासनाकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे