esakal | आज लोकमान्यांची स्मृती शताब्दी मात्र टिळक जन्मस्थानाची दुरवस्था...
sakal

बोलून बातमी शोधा

Century of Lokmanya tilak memory but lokmanya home is poor

 मानबिंदू ताठ मानेने सांगू का ? धनंजय भावे यांची खंत; आज पुण्यतिथी, वर्षभर दुर्लक्षच

आज लोकमान्यांची स्मृती शताब्दी मात्र टिळक जन्मस्थानाची दुरवस्था...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीत झाला, हा रत्नागिरीकरांच्या अभिमानाचा मानबिंदू; मात्र टिळकांचे जन्मस्थान समाज म्हणून आम्ही कसे जतन करून ठेवले आहे, हे पाहण्यासाठी तेथे फेरफटका मारला तर अत्यंत विदारक चित्र दिसते. सातत्याने पुरातत्त्‍व खात्याच्या दुर्लक्षामुळे दुरवस्थेत असलेले हे जन्मस्थान आणखी भग्नतेकडे वाटचाल करणार का, या शंकेने अस्वस्थता येते, अशी खंत टिळक जन्मभूमीला लागूनच राहणारे ॲड. धनंजय भावे यानी व्यक्त केली.

टिळकांची पुण्यतिथी मोठ्या इव्हेंटने साजरी होत आहे; मात्र हा एक दिवस सोडला तर या स्मारकाकडे फक्त दुर्लक्ष आणि दुर्लक्षच होताना दिसते, असे सांगत स्मारकाशेजारी दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या ॲड. भावे यांनी स्मारकाच्या दुरवस्थेचा, तेथील असुविधांचा आणि कारभाराचा पाढाच ‘सकाळ’शी बोलताना वाचला.


हेही वाचा-मालवण पालिकेच्या इतिहासात प्रथमच उपक्रम, काय आहे तो? वाचा... -


भावे म्हणाले की, टिळक जन्मभूमी हे स्मारक बांधकाम खात्याच्या ताब्यात होते. त्या काळात या स्मारकाची दुरुस्ती आणि देखभाल उत्तम प्रकारे होत होती. आता हे स्मारक पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येते. ज्या राष्ट्रीय पुरुषाची प्रतिकृती आम्ही दिल्लीमध्ये तमाम जनतेसमोर ठेवली, त्यांच्या जन्मभूमीत स्मारकाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. स्मारकात माडांची बाग आहे. आंब्याची आणि इतर झाडे यांनी 
नटलेल्या या सुमारे एक एकर क्षेत्राची साफसफाई होत नाही. त्यामुळे तो परिसर पडीक, गचाळ, बकाल झालेला आहे.

हेही वाचा- राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने  या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना  काढले फर्मान का वाचा.... -

भरपूर पाणी असलेली विहीर असूनही वेळोवेळी नादुरुस्त पंपाअभावी येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. पाणी साठवण्याची व्यवस्था नाही. कुलर कित्येक वर्षे बंद आहे. पर्यटकांसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहावरील साठवणूक टाकीमध्ये पाणी पुरविणारी पाईप लाईन नादुरुस्त असते. काही वर्षांपूर्वी स्मारकाचे दर्शनी भागातील एका प्राचीन वास्तूचे नूतनीकरण केले. दर्शनी भागात वास्तू अपूर्णच आहे.

टिळक जन्मस्थानाची माहिती सांगण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था नाही.बनविणारे उत्तर या जागेमध्ये दोन वास्तू वापरा अभावी गेले वर्षभर पडून आहेत. कधीतरी येथील पुरातत्व खात्याचा अधिकारी नुसतीच पाहणी करून जातो, काहीतरी सूचना करून जातो, हेही मी पाहिले आहे. सुधारणांविषयी काही विचारले तर आता सर्व स्मारकाच्याच दुरुस्तीचा प्रस्ताव आम्ही पाठवतो आहोत, असे बनविणारे उत्तर देतो, असेही भावे यांनी बोलून दाखवले.

संपादन - अर्चना बनगे