esakal | यंदा गणेशोत्सवात सावंतवाडीतून मुंबईसाठी 12 बसेस
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा गणेशोत्सवात सावंतवाडीतून मुंबईसाठी 12 बसेस

गौरी-गणपती स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांसाठी १२ बसेस मुंबई येथे पाठवण्यात येणार आहेत

यंदा गणेशोत्सवात सावंतवाडीतून मुंबईसाठी 12 बसेस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील आगाराकडून नियोजन सुरु झाले आहे. चाकरमान्यांसाठी मुंबई, ठाणे, पुणे येथून शिवशाही गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून गौरी-गणपती स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांसाठी १२ बसेस मुंबई येथे पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली.

गौरी-गणपती सणासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येतात; मात्र गेली दोन वर्ष कोरोना महामारी संकट असल्याने गेल्यावर्षी चाकरमान्यांनी कोकणात येणे टाळले होते. आता कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाले असून शासनाने काही निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे यावर्षी चाकरमानी यांचा कोकणाकडे मोठ्या प्रमाणात कल असणार आहे. एसटी महामंडळाने चाकरमान्यांसाठी मुंबई, ठाणे, पुणे येथून जादा बसेस सोडण्याचे नियोजन सुरु केले आहे.

हेही वाचा: बॅरेलमध्ये बुडून अडीच वर्षाच्या 'शिवानी'चा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी आगारातून शिवशाही बसही सुरु करण्यात आल्या आहेत. येथील आगारातून ठाणेसाठी चिपळूण मार्गे सकाळी साडेसहा वाजता बस सुटणार असून पुन्हा ठाणे येथून सावंतवाडी येथे येण्यासाठी सकाळी सात वाजता सुटणार आहे. सावंतवाडी-पुणे शिवशाही बस येथील आगारातून सकाळी साडेआठ वाजता सुटणार आहे. पुणे-सावंतवाडी बस पुणे निगडी येथून सकाळी साडेसहा वाजता सुटणार आहे.

७ सप्टेंबर पासून शिवाजीनगर आगारातून पुणे-सावंतवाडी बस सायंकाळी ४, ७ व सकाळी साडेआठ वाजता सुटणार आहे. या बसचे तिकीट आरक्षण सुरू आहे. प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक पडोळे यांनी केले आहे. अद्याप बेळगाव, गोवा मार्गावरील फेऱ्या बंदच आहेत. यामुळे अनेक नोकरदार वर्गाचे नुकसान होत आहे. गोवा येथे सिंधुदुर्ग येथील अनेक युवापिढी नोकरीसाठी जात आहेत; मात्र फेऱ्या बंद असल्याने याचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: 'बनावट जात' प्रमाणपत्र प्रकरणी आता तहासिलदारांवरही गुन्हा दाखल होणार

...तर खासगी वाहनांचा वापर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर युवा पिढी सिंधुदुर्गात येणार असून गोवा मार्गावरील एसटी फेऱ्या बंद राहिल्यास त्यांना खाजगी वाहनाचा वापर करावा लागणार आहे; मात्र या मार्गावरील बंद फेऱ्यांचा तोटा सावंतवाडी आगाराला सहन करावा लागत आहे. गोवा, बेळगाव मार्गावरील सुमारे एक ते दीड लाख रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे. येथील आगाराकडून पूर्वी ४११ फेऱ्या चालू होत्या; मात्र यातील २०० फेऱ्या सध्या सुरू असून प्रतिदिनी साडेतीन लाखाचे उत्पन्न प्राप्त होत असून गोवा बेळगाव मार्ग चालू झाल्यास पाच लाखापर्यंत उत्पन्न जाणार असल्याचे आगाराकडून सांगण्यात आले.

loading image
go to top