esakal | बॅरेलमध्ये बुडून अडीच वर्षाच्या 'शिवानी'चा दुर्दैवी मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

बॅरेलमध्ये बुडून अडीच वर्षाच्या 'शिवानी'चा दुर्दैवी मृत्यू

कारखाना परिसरात कामगारांसाठी बांधलेल्या खोलीत राजू पत्नी सीतादेवी आणि मुलगी शिवानीसह राहतात.

बॅरेलमध्ये बुडून अडीच वर्षाच्या 'शिवानी'चा दुर्दैवी मृत्यू

sakal_logo
By
नरेंद्र बोते

कागल : खेळताना तोल गेल्याने बॅरेलमधील पाण्यात बुडून अडीच वर्षाच्या परप्रांतीय बालिकेचा मृत्यू झाला. शिवानी राजू सहानी असे या बालिकेचे नाव आहे. कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील सिमेंट पाईप कारखान्यात आज सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली आहे.

पंचतारंकीत औद्योगिक वसाहतीत श्री लक्ष्मी सिमेंट पाईप कारखाना आहे. या कारखान्यात बिहार येथील मुजफ्फरपुर जिल्ह्यातील नरमा पछियाली टोला येथील राजू सहनी काम करतात. कारखाना परिसरात कामगारांसाठी बांधलेल्या खोलीत राजू पत्नी सीतादेवी आणि मुलगी शिवानीसह राहतात. या खोल्यांसमोर कुपनलिका असून मोटरच्या सहाय्याने त्यातील पाणी प्लास्टिकच्या बॅरेलमध्ये सोडण्यात येते.

हेही वाचा: जलसंपदामंत्री 'करेक्ट कार्यक्रमाच्या' तयारीत

सकाळी साडेअकरा वाजता सीतादेवी येथे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. सोबत शिवानीही होती. धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी त्या बाजूला गेल्या. दरम्यान खेळणारी शिवानी बॅरेलजवळ गेली आणि तोल गेल्याने बॅरेलमध्ये पडली. सीतादेवी यांना शिवानी दिसेनाशी झाली. शोधाशोधा केल्यानंतर ती बॅरेलमध्ये पडलेल्याचे आढळून आले.

यावेळी राजू यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला कागलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी कागल पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी भेट दिली . पोलिस नाईक महादेव बिरांजे आर.आर. पाटील, विनायक औताडे, रविकुमार सावंत, आरमा जमादार यांनी पंचनामा केला. ग्रामीण रूग्णालयात शिवानीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसातून सांगण्यात आले.

हेही वाचा: 'बिरोबा वाटोळ करतो, तर मी आमदार कसा झालो?'

loading image
go to top