Chandrakant Patil addresses media
sakal
कोकण
Chandrakan Patil : प्रशासनात अजित पवारांसारखी ‘आदरयुक्त भीती’ निर्माण करा; चंद्रकांत पाटील यांचा सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Sunetra Pawar Advice : रत्नागिरीतील कोकण दौऱ्यावर असताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनावर प्रभाव निर्माण करण्यासाठी ‘आदरयुक्त भीती’ आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
रत्नागिरी : निवडणुकांच्या धावपळीतून विसावा घेण्यासाठी कोकण दौऱ्यावर आलो. प्रशासन सहजासहजी कोणाला जुमानत नाही, त्यासाठी अजित पवार यांनी आपल्या कामातून प्रशासनात एक आदरयुक्त भीती निर्माण केली तशीच भीती तुम्हालाही निर्माण करावी लागेल, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना दिला.

