इलेक्ट्रिक वाहनांसाठी पालिका उभारणार आता चार्जिंग पॉइंट

charging point provide from corporation of ratnagiri for electric vehicles in ratnagiri
charging point provide from corporation of ratnagiri for electric vehicles in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ‘माझी वसुंधरा अभियाना’ अंतर्गत पालिकेच्या आवारात इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘चार्जिंग स्टेशन’ (पॉइंट) उभारण्यास मंजुरी देण्यात आली. या अभियानांतर्गंत चार्जिंग पॉइंटचे जाळे उभारण्यात येणार आहे. नवीन धोरणानुसार कोणीही चार्जिंग स्टेशन उभारू शकणार आहे. पालिकेला त्यासाठी महिन्याला सुमारे २ हजार रुपये वीज बिलापोटी भरावे लागणार आहेत.  

‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. यामुळे पालिकेला व इतरांना उत्पन्नाचा नवा स्रोत मिळणार आहे. देशात हवा आणि ध्वनी प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे केंद्र सरकार लवकरच इलेक्‍ट्रीक वाहनांच्या विक्री वाढीसाठी नवीन धोरण आखले आहे. निसर्गाच्या या पंचतत्वासोबत जीवनपद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही.

जैवविविधतेचेही अस्तित्व राहणार नाही, म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन तेथे या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान हे राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यास शासन मान्यता 
दिली आहे. 

निःशुल्क सुविधा ः सर्वसाधारण सभेत मंजूर

दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेच्या आवारात चार्जिंग पॉइंट बसविण्यात येणार आहेत. त्या चार्जिंग पॉइंटच्या वीजबिलापोटी पालिकेला दर महिन्यास २ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. सुरवातीच्या कालावधीत ही सुविधा सुरू करताना निशुल्क चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.

पालिकेकडून अंमलबजावणी 

‘माझी वसुंधरा’ अभियानाचा २ ऑक्‍टोबरपासून प्रारंभ झाला आहे. येत्या ३१ मार्च २०२१ या कालावधीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी पालिकेनेही अंमलबजावणीला प्रारंभ केला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com