मांस विक्रीसाठी नेणाऱ्या तरुणाचा पाठलाग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

देवरूख - रानटी प्राण्याच्या मांस विक्रीसाठी नेणाऱ्या तरुणाचा पाठलाग करून वन विभाग, देवरूख आणि पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व सामान टाकून तो तरुण पसार झाला. घटनास्थळी सापडलेली मोटारसायकल, मटण आणि धारधार सुरे जप्त केले असून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार काल (ता. ८) दुपारी वाशी तर्फे देवरूख येथे उघडकीस आला. 

वाशीत रानटी प्राण्यांची शिकार करून त्याची मांस विक्री होत असल्याची माहिती देवरूख वनविभाग आणि पोलिसांना मिळाली होती. यावरून हेडकॉन्स्टेबल कदम, पवार यांच्यासह रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी आर. बी. कांबळे, वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक सागर गोसावी यांनी सोमवारी वाशी गावात वाहनांची तपासणी सुरू केली. गावाजवळच्या वहाळानजीक तपासणी करणारी गाडी येत असल्याचे पाहून दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाने आपल्याजवळच्या गाडीसह सर्व सामान तिथेच टाकून जंगलात धूम ठोकली. या पथकाने त्याचा पाठलाग केला, मात्र तो सापडून आला नाही. 

घटनास्थळी पथकाला ७ किलो मटण, ६ धारधार सुरे आणि कर्नाटक पासिंगची दुचाकी (क्रमांक केए- वाय - ८८९०) सापडली. अज्ञातावर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापडलेल्या मांसाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली ते डुकराचे असल्याचे निष्पन्न झाले. या डुक्‍कराची हत्या कोणत्या हत्याराने झाली हे तपासणीनंतर स्पष्ट होईल. 

पोलखोल पोलिसांनी करावा 
शिमगोत्सवात कोकणात पारधींना महत्तव असते. यातून परराज्यातील काही टोळ्या ग्रामीण भागात येतात. शिकारीचे मटण स्वतःला ठेवून त्याची विक्री होते अशी चर्चा आहे. वाशी येथे सापडलेली कर्नाटक पासिंगची दुचाकी हे याचेच लक्षण असून या सर्वाची पोलखोल पोलिसांनी करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chase after a young man carrying the meat