मालवण : शहरातील मेढा येथील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुतळा पूर्णपणे उभा राहिला असून महाराजांचा चेहरादेखील बसविला आहे. सध्या पुतळ्याचे इतर वेल्डिंग व पॉलिशिंग अशी कामे सुरू असून शुक्रवार (ता. २५) पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असून १ मे रोजी पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.