मी स्वप्न दाखवणार नाही पूर्ण करणार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Uddhav Thackeray Bhoomi Pujan  Development Plan in Ganapatipule kokan marathi news

कोकणचा कॅलिफोर्निया नाही; पण जगाला हेवा वाटला पाहिजे, असे कोकण बनविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

मी स्वप्न दाखवणार नाही पूर्ण करणार...

रत्नागिरी : मी तुम्हाला स्वप्न दाखवायला आलेलो नाही, तर स्वप्न पूर्ण करायला आलो आहे. कोकणचा कॅलिफोर्निया नाही; पण जगाला हेवा वाटला पाहिजे, असे कोकण बनविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आमचे आकडेबाजार सरकार नाही. कृतीला महत्त्व देणारे सरकार आहे. त्यामुळे जी कामे करायची आहेत, त्याचे आराखडे सादर करा. निधीची कमतरता पडू देणार नाही. गणपतीपुळेच नव्हे; तर कोकणसह नवा महाराष्ट्र घडवायचं काम करू, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला

गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार हुस्नबानू खलिफे, राजन साळवी, भास्कर जाधव, शेखर निकम, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आदी उपस्थित होते.  
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कोकणात आलो. कोकण आणि 

हेही वाचा- खुशखबर : आता मच्छीमारांचेही कर्ज होणार माफ...

माता-बहिणींचे दर्शन घेऊन काम

माता-बहिणींचे दर्शन घेतल्याशिवाय कोणते कार्य पुढे सरकतच नाही. आज नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा अर्थात शौर्यदिन साजरा करून मी इथे आलो. आता गणपतीपुळेचे दर्शन घेऊन आंगणेवाडीला जाणार. म्हणून म्हणतो की, आज तीर्थयात्रेचा दिवस असल्याने मी माझे भाग्य मानतो. मुंबईतही समुद्र आहे आणि कोकणातही; पण कोकणातला समुद्र स्वच्छ व नितळ आहे. हे मी पूर्वी छायाचित्रण करताना बघितले आहे. इथल्या मातीतील माणसं ही अशीच निर्मळ, हृदयातील तळ दिसेल एवढी स्वच्छ आहेत.


हेही वाचा- शेतकऱ्यांसाठी खुशखबर : लगेच आपले बॅक खाते चेक करा...

निधी कमी पडू देणार नाही.

या कोकणचा विकास करताना निधी कधीच कमी पडू देणार नाही.’’ते म्हणाले, ‘‘कोणत्याही ठिकाणचा विकास करताना तेथे स्वच्छता, पायाभूत सुविधा, उद्यान ही असायलाच हवीत. आपण आपल्या देवस्थांनाना देखील तितकं मंगलमय ठेवलं पाहिजे. म्हणजे भाविकांना मंगलमूर्तीचं दर्शन झाल्याचं समाधान खऱ्या अर्थाने प्राप्त होईल. अंबरनाथप्रमाणे गणपतीपुळ्याचेही वातावरण स्वच्छ आणि मंगलमय करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करा. तुमच्या आशीर्वादामुळेच कोकण आणि शिवसेना यांचे नाते घट्ट आहे. गणपतीपुळ्याला मी यापूर्वीही आलो आहे; पण माझ्या दृष्टीने माझ्यासमोर बसलेले तुम्ही सर्व माझ्यासाठी गणराय आहात. तुमच्याच आशीर्वादाने मला हे पद मिळाले आहे.’’